31 जानेवारीपर्यंत वाढले लॉकडाउनः मनपा आयुक्तांचे आदेश जारी

नागपूर:- कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जारी करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांसह सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनला 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यानी हा आदेश जारी केला ते आपल्या आदेशात म्हणाले की, लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य सरकारने मिशन बिगिन अगेनमध्ये जारी केलेल्या अटी अजूनही लागू केल्या गेलेल्या आहेत.
३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या पाहता हे लॉकडाउन 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले. ते आता 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागपूर महानगरपालिका हद्दीतील संबंधित अधिका-यांनी लॉकडाऊन विस्तारासंदर्भात कामकाज गांभीर्याने सुरू ठेवावे. भविष्यात कोरोना प्रसाराची परिस्थिती पाहता, वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करणे देखील शक्य असल्याचे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.