१ तारखेपासून नागपूरात ‘लॉकडाउन’, अफवा कि सत्य?
नागपूर:- आज पहाटेपासूनच नागपुरात सर्वत्र हिच चर्चा जोरदार जोरात सुरू आहे की १ ते ४ ऑगस्ट या तारखेपर्यंत नागपुरात लॉकडाउन लादण्यात येणार आहे, या संबंधिची प्रत्येकजणच ऐकिव माहिती एकमेकांत प्रसारित करत आहे. , प्रत्येकच जण असे मानत आहे की नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत व याच प्रकारच्या परिस्थितीत नागपुरात लॉकडाउन होईल अशी अफवा आली. लोकांनी फॉर्वर्ड करत एकाची दुसर्यांना पाठवायला सुरवात केली आणि ही बातमी लवकरच खुप व्हायरल झाली.
4 दिवसाच्या लॉकडाउन बातमीचे सत्य:
नागपुरात १ ते ४ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन ची ही बातमी निव्वळ अफवा आहे, या अशा बंदीबाबत नागपूर प्रशासनाकडून अधिकृत माहिती नाही, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनीही या बातमीत तत्थ्य नसल्याचे म्हटले आहे आणि नागपुरात असे कोणतेही लॉकडाउन नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे, जेव्हाही लॉकडाउन होणार असेल तेव्हा 4 दिवस अगोदर त्याबाबत जनतेला कळविले जाईल जेणेकरून जिवनावश्यक वस्तू साठा लोक सहजतेने करू शकतील, ज्यायोगे लॉकडाऊन दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचण येऊ नयेत, सध्या जी लॉकडाउनची बातमी चालू आहे, त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये ही केवळ अफवा आहे. हे लक्षात घ्यावे