महापौरांना बनवले पॉजिटिव्ह? काय आहे सत्य, वाचा
सोशल मीडिया आजकाल माहितीचे आदानप्रदानाचे उत्तम स्थान झाले आहे, मात्र त्यावर येणाऱ्या सर्व वृत्तांची खात्री देता येईलच असे नाही. अगदी कालचेच उदाहरण घ्या, नागपूर नगरीचे महापौर संदीप जोशी काल स्वतःहून गृह विलगीकरणात गेले, पण त्याच वृत्ताची चिरफाड करत आज सर्वत्र त्यांच्याविषयी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संदेश फॉरवर्ड होत सर्वत्र व्हायरल झाला.
यामुळे महापौर संदीप जोशी यांनी आत्ताच एक पत्र सोशल मीडिया व अन्य माध्यमांवर निर्गमित केले आहे, पत्रात सर्वप्रथम व्हायरल होत असलेल्या त्या फेक मेसेज चे तपशील वृत्त दिलेले आहे
“माझ्या असे निदर्शनास आले आहे की माझे संबंधीचा एक खोटा फेक मेसेज सर्व सोशल मीडियावर साइटवर वायरल होतो आहे, मेसेज चे वृत्त असे:
“परिस्थिती फार काळजीची आहे कोरोनाचा आपल्या दारापर्यंत शिरकाव झालेला आहे. काळजी घ्या, आपले महापौर संदीप जोशी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
काळजी घ्या घरी राहा,” असा तो मेसेज आहे
आपणास या प्रकारचा मेसेज आला असल्यास कृपया हा मेसेज फॉरवर्ड करू नये. माझ्याशी संबंधित हा मॅसेज पूर्णतः चुकीचा असून त्यात मी कोरोना पॉझिटिव असल्याचा उल्लेख आहे जो संपूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा आहे.
माझी प्रकृती एकदम ठणठणीत असून फक्त वैद्यकीय तज्ञांच्या सल्यानुसार दक्षता म्हणून मी स्वतःस सात दिवसासाठी गृह विलगीकरणात लोटले आहे.
अन्य सर्व अफवा पूर्णपणे निराधार आहेत, सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपल्यापर्यंत येणारे वृत्ताची नेहमी शहानिशा, खात्री केल्यानंतरच तो मेसेज, वृत्त समोर फॉरवर्ड करावे, वृत्तांसाठी खात्रीपूर्ण माध्यमांवरच विश्वास ठेवावा.
आपणास वृत्त पाठवणाऱ्यास जर ते वृत्त निराधार असल्यास त्याविषयक जागृत करावे अथवा फॉरवर्डेड मेसेज डिलीट करण्याविषयची विनंती करावी.
कसल्याही माध्यमावर पोस्ट करण्यापूर्वी खात्री करणे ही सवय असणे अगदी उत्तम. पण वारंवार विनंती करूनही कोणी ऐकत नसेल आणि मेसेज मा-याचे कार्य सुरूच रहात असेल तर अशा व्यक्तीस रिपोर्ट करावे.
आपल्या शहरास कोरोणामुक्त तसेच अफवामुक्त बनवूया. नेहमीसाठीच ही उत्तम सवय लावून धरूया. एकत्र या व लढा द्या.
आपली काळजी घ्या व सर्वांची काळजी घ्या