मानवसेवानगर कॉम्प्लेक्स सील: मनपाने कंटेनमेंट झोन घोषित केले
नागपूर:- शहराचे काही भागांत कोरोना बाधीत आढळल्यावर आजूबाजूचा परिसर सील करण्याची प्रक्रिया स्वीकारली गेली, त्याच मार्गावर आता धरमपेठ झोन अंतर्गतचा प्रभाग क्र .१२ मधील मानवसेवानगर (गजानन प्रसाद सोसायटी) मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. लोकांच्या सुरक्षेसाठी व दुष्परिणाम रोखण्यासाठी व त्या परिसरातील काही भाग सील करण्यासाठी मनपा आयुक्त मुंढे यांनी आदेश जारी केले.
या भागात प्रवेशाचे सर्व मार्ग तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आणि सीमारेषा सील करण्याचेही आदेश देण्यात आले. केवळ तातडीच्या सेवेत काम करणार्या सरकारी व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना, वैद्यकीय कारणास्तव, डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअरचे दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, पोलिसांतर्फे वाटप केलेले पासधारक, अत्यावश्यक वस्तू पुरवठादार यांनाच यातून सूट देण्यात आली आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार धरमपेठ झोन क्रमांक 2 प्रभाग 12 अंतर्गत मानवसेवानगर (गजानन प्रसाद सोसायटी) मध्ये उत्तरेस आशालता श्रीवास्तव यांचे घर, दक्षिणेस श्रीचरण श्रीवास्तव यांचे निवास, पूर्वेस कडू यांचे निवासस्थान. पश्चिमेस काळे आणि इंगळे यांच्या घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला. या प्रतिबंधित भागातून रहदारी पूर्णपणे बंद करण्यासाठीचे निर्देश पोलिस प्रशासनाला देण्यात आले.