मनिष नगर उड्डान पूल वाहतुकीसाठी सज्ज
नागपूर:- मनिष नगर व परिसर ज्या झपाट्याने रहिवास क्षेत्रात रूपांतरीत झाला व या परिसरातून वर्धा रोडला जाणा-या नागरिकांची गैरसोय येथील रेल्वे क्रॉसिंग मुळे व्हायची त्याबाबत स्थानिकांनी प्रशासन व रेल्वे विभागाकडे कैकदा गा-हाणे मांडले परिणामी येथे रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी) मंजुर झाला. सदर बांधकाम पुर्णत्वास आलेय.
वर्धा रोड वरील डबल डेकर पूलाशी जोडलेल्या या मनिष नगर उड्डाणपुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. आरयुबी आणि डबल डेकर उड्डाणपुलाचे काम अगोदरच पूर्ण झालेले होते, हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे व हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. येत्या 13 तारखे पासून पुलावरील वाहतूक सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूलावरिल वाहतूक सुरू झाली तरी सुरुवातीला काही दिवस आरयुबी वर काही दिवस वन वे लाच मान्यता राहिल
वर्धा रोड सारख्या वर्दळीच्या मार्गावर डबल डेकर पूल बनवविल्यानंतक अजनी चौकातून
एअरपोर्ट वर केवळ पाच मिनिटात पोहोचता येईल, तसेच मनिष नगर उज्वल नगर कडे जाणाऱ्या पथिकांसाठी आरयुबी सोपा व सुलभ मार्ग ठरेल. आर यु बी च्या माध्यमातून मनिष नगर व परिसरातील नागरिक याचा वापर करीत वर्धा रोडवर सहजपणे पोहोचू शकतील