मानमोडे लेआउट आणि मार्टिनगर परिसर सील: मनपाने केले कंटेनमेंट झोन घोषित
नागपूर:- शहरातील काही भागात कोरोना रूग्ण आढळल्यास, आजूबाजूच्या भागात सीलिंगची प्रक्रिया स्वीकारली गेली, त्याच क्रमात आता मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग 11 मधले मानमोडे लेआउट, झिंगाबाई टाकळी आणि प्रभाग 1 चे मार्टिननगरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने लोकांच्या सुरक्षिततेसाठी व संसर्ग दुष्परिणाम रोखण्यासाठी या परिसरास सीलबंद करण्यासाठीचे आदेश मनपा आयुक्त मुंढे यांनी निर्गमीत केले.
या भागातील सर्व हालचालींस तातडीचे प्रभावाने बंद केले गेले, सीमा सील करण्याचे आदेश दिले. केवळ तातडीच्या सेवेत काम करणार्या सरकारी व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना, वैद्यकीय कारणास्तव, डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअरचे दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, पासधारक आणि पोलिसांद्वारे वितरीत पासधारक जे आवश्यक वस्तू पुरविणा-या लोकांत मोडतात अशांना यात सूट देण्यात आली आहे.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवारी झोन प्रभाग 11 अंतर्गत, मानमोडे लेआउट, झिंगाबाई टाकळीतील दक्षिण-पूर्वेतील सनशाईन इमारत, दक्षिण-पश्चिमेतील राजेंद्र निठोणे, उत्तर-पश्चिमेकडील रोहन खंडेलवाल यांच्या यांच्या इमारतीचा परिसर आणि ईशान्येकडील शंकरराव राठोड यांच्या निवासस्थानापर्यंतचा परिसर बंद केला.
त्याचप्रमाणे प्रभाग 1 च्या मार्टिनगरच्या दक्षिण-पूर्वेस भगवान लांजेवार यांच्या निवासस्थानापर्यंत, दक्षिण-पश्चिमेस मायकेल फर्निचर, उत्तर-पश्चिमेस मारिस सिरिलचे निवासस्थान, उत्तरेस पिंटू किराणा व उत्तर-पूर्वेतील गणेश सहारे यांचे निवासस्थानापर्यंत बंदी जाहीर केली. मनपाचे अधिकारी आणि पोलिस प्रशासनास योग्य कारवाईचे निर्देशही देण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रात, तातडीच्या घटना वगळता, इतर हालचाली पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.