मिशन बिगीन अगेन: ऑगस्टपासून नागपूरात मॉल उघडणार?
नागपूर:- कोरोना साथीच्या प्रादुर्भावात लॉकडाऊनमुळे गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेल्या मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सला दिलासा मिळाला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत मनपा आयुक्त मुंढे यांच्या वतीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानुसार 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू होतील. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत व्यवसायासाठी अनुमती दिली जाईल.
मॉलअंतर्गत सिनेमाघराव्यतिरिक्त, फुड कोर्ट, रेस्टॉरंट्सच्या किचन ना देखील परवानगी दिली जाईल, परंतु त्यांना केवळ होम डिलिव्हरीच करता येईल. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार औद्योगिक युनिटला पूर्वीप्रमाणेच परवानगी दिली आहे. यात कोणताही नवीन दिलासा दिला गेलेला नाही. त्याचप्रमाणे बांधकाम व पर्जन्यपूर्व कामांनाही पूर्वीप्रमाणे परवानगी देण्यात येणार आहे.
वाहनांत प्रवाशी संख्येत दिलासा: मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास मान्यता देण्यात आली असताना, वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या प्रवाशांची संख्याही वाढविली गेली आहे. टॅक्सी आणि कॅबमध्ये आता चालक व्यतिरिक्त 3 प्रवासी, रिक्षात ड्रायव्हर व्यतिरिक्त 2, चारचाकी वाहनात चालक व्यतिरिक्त 3 दुचाकी वाहनात डबल सीट परंतु दुचाकीमध्ये हेल्मेट आणि मास्क लावण्याचे अत्यावश्यक केले आहे.
गोल्फ, जिम्नॅस्टिक, बॅटमिंटनला परवानगी: मैदानी खेळांत संघाव्यतिरिक्त गोल्फ कोर्स, आउटडोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅटमिंटन आणि मलखांब यासारख्या खेळांनाही सोशल डिस्टंसींगच्या अटीवर परवानगी दिली जाईल. परंतु पोहण्याच्या तलावांवरील बंधन पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले गेले आहे. या व्यतिरिक्त, पूर्वीच्या अनलॉक मधे ज्या व्यवसायिक अॅक्टिव्हिटींना परवानगी होती ती पूर्वीच्याच अटींच्या आधारावर सुरू राहील. सरकारी कार्यालये व खासगी कार्यालयांमध्ये कर्मचार्यांच्या उपस्थितीवरील बंदी कायम राहील.