मान्सूनचा अंदाज: येत्या 24 तासात नागपूरसह महाराष्ट्रात पाऊस
मुंबई:- कोरोना संकटाच्या गराड्यात असतानाच शेतकर्यांना दिलासादायी बातमी मिळण्याचा संभव आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या चोवीस तासात मान्सून राज्याच्या बर्याच भागात पोचेल आणि चांगला पाऊस पडेल. मुंबई व आसपासच्या भागातही गुरुवारी संथ पाऊस बरसला. हवामान खात्याचा अंदाज आहे की 13 आणि 14 जून रोजी मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याचे उपमहासंचालकांनूसार, मान्सून अरबी समुद्राच्या उत्तरेस 18 अंश उत्तरेकडे रत्नागिरीमार्गे सोलापूरकडे जात आहे. पुढील 24 तास पावसाळ्याचे मार्गक्रमणासाठी अत्यंत अनुकूल आहेत.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यातील बहुतांश भागात येत्या 4 दिवसांत पाऊस पडेल. त्यानंतरच्या शनिवारी आणि रविवारी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. लोकांना जागरुक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पावसाळ्याची सुरूवात झाली आणि महानगराच्या दादर, माटुंगा, कुलाबा, मालाड, कांदिवलीसह ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. यंदा राज्यात मान्सून सामान्य राहील, असा अंदाज आहे.