मुंढेनी 24 तासात पुरावे द्यावेत, अथवा पोलिसांत दाखल करू एफआयआर: तिवारी
नागपूर:- मनपा मधे आयुक्त असताना मुंढे यांचा सत्ताधा-यांशी असलेला संघर्ष नवीन नसला तरी बदली झाल्यानंतरही हा ट्रेंड कायम आहे. हा अंदाज यावरूनच बांधता येईल की, आता चरित्रहननाच्या मुद्द्यावर मुंढे यांनी केलेल्या आरोपांच्या तीव्र विरोधात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रपरिषदेत 24 तासांच्या आत उपमहापौर मनीषा कोठे यांकडे त्यांनी पुरावे देण्याची मागणी केलीय, तसे पुरावे न दिल्यास भाजप आणि भाजपा महिला आघाडीच्या सर्व महिला नगरसेवकांनी पोलिसात एफआयआर नोंदविण्याचा इशारा दिला. मुंढे यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे सांगत तिवारी म्हणाले की, संपूर्ण कृत्य भाजपने केल्याचा आरोप केला आहे. भाजपाला जे करायचे होते, ते सभेत व रस्त्यावर येऊन आपली भूमिका स्पष्ट राखली आहे.
कोठे, केव्हा आणि कशी घडली घटना: मुंढेंवर
पलटवार करत त्यांनी या प्रकरणात चारित्यहनन केल्याचे जे ते सांगतात तर हे कुठे, केव्हा आणि कसे घडले याचा पुरावा द्यावा. आयुक्त असतांना त्यांची कार्यशैली अशी होती की ते कोणालाही भेटत नव्हते. भेटण्यापूर्वी त्यांना सुचना द्यावी लागायची, ज्यातुन कोणती स्त्री त्यांचेकडे केव्हा भेटली याबद्दल त्यांच्याकडे माहिती असेलच.
मुंढे कॅमेराप्रेमी होते. ऑनलाईन महासभेच्या वेळी सभा दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली तेव्हा काही नगरसेवक एकमेकांशी चकल्लस करत असल्याचे व्हिडिओ मुंढेंच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रसारित करून नगरसेवकांचेच चारित्य्रहनन करण्याचे काम केले आहे.
सर्वत्र सीसीटीव्ही: कार्यालय, घर आणि सर्वत्र सीसीटीव्ही लागून होते. पुन्हा अगदी सुरक्षारक्षकासह ते चालत. घटनेच्या वेळी केमेरे देखील सुरू असतीलच त्यामुळे त्याबाबतचे फुटेज 24 तासात उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी या प्रसंगी केली. ते म्हणाले की, मुंडे सध्या एकांतवासात आहेत. म्हणून, ते बाहेर येऊ शकत नाहीत, परंतु ऑनलाइन पद्धतीने ते उपमहापौरांना हे पुरावे नक्कीच पाठवू शकतात.