नागपूरात सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग, फेस मास्क वाटप
नागपुर:- कोवीड19 प्रसार टाळण्यास लागू संचारबंदीमुळे 2 महिन्यांपासून बंद विमानतळावर सोमवारपासून उड्डानांस प्रारंभ झाला त्यावेळी येथे सुरक्षितता आणि सावधगीरीकडे काटेकोर लक्ष ठेवले गेले होते. विमानांत बसण्यापूर्वी प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले गेले. सर्व प्रवाशांस एअरलाइन्स वतीवे फेस मास्क वाटप झाले ते घालूनच विमानात प्रवासी बसविले गेले, फ्लाइट अडेन्टेंट पीपीई किट पेहरावात होत्या.
सुरक्षा कर्मचारी देखील पीपीई किट वापरावर भर देऊन होते. परिसरास वारंवार सॅनिटाइज्ड केले जात होते. येणा-या सर्व प्रवाशांचे हातावर होम क्वॉरंटाईनचे ठशे लावले जात होते. विमान सेवा सुरु होण्यापूर्वीच सरकारतर्फे सुरक्षेसंबंधित सर्व मार्गदर्शक सूचना घोषित केल्या गेल्या. प्रवाशांस 2 तास आधी विमानतळावर पोचन्याचे निर्देश होते. एंट्री गेट वर स्क्रीनिंगनंतरच प्रवाशांस आत जाऊ दिले गेले.
बर्याच कालावधीनंतर दिसल्या घडामोडी: फ्लाइट ऑपरेशन चालू झाल्यामुळे बर्याच कालावधीनंतर विमानतळावर घडामोडी आढळल्या. प्रवाशांची संख्या खूपच कमी होती. लॉकडाउनपूर्वी रोज 30 पेक्षा जास्त विमानांचे आवागमन सुरू होते. लॉकडाउन नंतर पहिल्या दिवशी फक्त 4 विमान आले. सकाळपासून फ्लाईट अटेंडंट, हवाई परिचारिका कामावर पोचले.
कोलकाता विमानास मंजूरी नाही: पश्चिम बंगाल मध्ये विमान सेवा 28 मे पासून सुरू होतील. नुकत्याच आलेल्या अम्फान महावादळाने जिवीत व वित्तीय असे बरेच नुकसान झालेय. आधी इंडिगो कडून कोलकातासाठी एक विमान सोमवार पासून तयारीत असणार होते. मात्र वादळा नुकसानाच्या आढाव्यानंतर 28 मे पर्यंत विमानसेवा सुरू न करण्याचा निर्णय घेतला गेला.
टॅक्सी सेवा बंदच: सोमवार पासून विमानसेवांचा प्रारंभ झाला परंतु टॅक्सी सर्व्हिसेस पुर्ववत नाहीत. प्रशासनाकडून अद्याप टॅक्सी आणि ऑटो चालविण्यास्तव मंजूरी दिली गेली नाही, अशावेळी प्रवाशांना आणने नेणे ई साठी खाजगी वाहनांचा वापर करावा लागला. विमानतळ परिसरातील टॅक्सी स्टॅडही रिकामे आढळत होते.