नागपूरच्या युवकांनी थोर पुरुषांचे पुतळे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांना पुसून त्यांना हार अर्पण केले.
नागपूर:- काल शुक्रवार म्हणजेच दि.१ मे २०२० “महाराष्ट्र दिन ” या दिनाचे औचित्य साधून “एक हात मदतीचा “मित्र परिवारा तर्फे, एक भारतीय नागरिक या नात्याने नागपूर शहरात १ मे महाराष्ट्र दिनी काही युवकांनी थोर पुरुषांचे पुतळे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांना पुसून त्यांना हार अर्पण करण्यात आलेत. हे आपल्या देशासाठी आपल्याच महाराष्ट्रासाठी झटले , ज्यांनी हा संयुक्त असा हा महाराष्ट्र घडविला आपल्या जीवाची पर्वा न करता आपली आहुती दिली असे आपल्या महाराष्ट्रचे तसेच या देशाचे शूरवीर योद्धे , लढवय्ये यांच्या पुतळ्यास स्वच्छ पाण्याने अभिषेचन करून तसेच पुष्प माल्यार्पण करून अभिवादन केले व प्रार्थना केली की संपुर्ण जग सध्या कोरोना विषाणू ग्रस्त या महामारी रोगांने त्रासलेला आहे तो नष्ट होवो आणि हा आपला अखंड हिंदुस्थान अखंड महाराष्ट्र पुन्हा उजळून येवो , लोकांच्या मनात पुन्हा एक नवं आशेच किरण पल्लवित होवो अशी मनोकामना या ठिकाणी आमच्या मित्र परिवारांनतर्फे या उपक्रमात अमेय पांडे, लावकुमार आंबटकर, मोहित हिरडे, आशिष जोशी सहभागी होते.