नागरी समस्या सोडविण्यास थेट करा डीसीपीशी संपर्क : सीपी उपाध्याय
नागपूर:- शहरातील बहुतेक पोलिस ठाण्यांमध्ये नागरिकांना त्यांच्या समस्या व तक्रारी नोंदवण्यासाठी अनेक दिवस चकरा माराव्या लागतात. या दरम्यान लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नागरिकांच्या अशा समस्या लक्षात घेऊन सी. पी. बि. के. उपाध्याय यांनी समस्येचे निराकरण न झाल्यास संबंधित पोलिस स्टेशनला झोनच्या डीसीपीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी सर्व झोनच्या डीसीपीच्या कार्यालयाचे नाव व पत्ता असलेले एक पत्रक जारी केले, ते म्हणाले की, पोलिस ठाण्यातील कोणताही अधिकारी व कर्मचारी समस्या सोडवत नसल्यास डीसीपीशी संपर्क साधून त्यांना समस्या सांगा. असे केल्याने नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतील. यानंतरही या समस्येचे निराकरण झाले नाही तर ते पोलिस आयुक्तांना भेटू शकतात.
येथे संपर्क साधा:
युनिट क्रमांक डीसीपी नाव फोन नंबर कार्यालयाचा पत्ता
- 1 डीसीपी विवेक मासाल 0712-25443953 एनआईटी मार्डन शाळेजवळ, राणाप्रतापनगर
- 2 डीसीपी विनिता साहु 0712-2559922 सिताबर्डी पो स्टे, मॉरिस टीप्वाइंट चौक
- 3 डीसीपी राहुल माकणीकर 0712-2738282 कोतवाली पोलिस स्टेशन महाल
- 4 डीसीपी विवेक मासाल (अति. चार्ज) 0712-2747753 अजनी रेलवे स्टेशन जवळ
- 5 डीसीपी निलोत्पल 0712-2632665 पंचम ईस्टेट, दिक्षीत नगर, नारी रोड, जरीपटका