Uncategorized

२६ एप्रिल शटडाऊन:  नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन ३ तास बंद तर गोधनी येथील ‘पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र’ १४ तास राहणार बंद

शट डाऊन काम दरम्यान टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा होणार नाही  ….

परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे…

नागपूर, एप्रिल २४, २०२३ : येत्या २६ एप्रिल  (बुधवार ) रोजी महापारेषण (MSETCL) ने 33 KV फिडर जी १३२ के वी  मनसर सब स्टेशन, रामटेक  वरून येते त्यावर काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी, रोजी ३ तासांचे (सकाळी ८ ते११ पर्यंत)  शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. महापारेषण च्या ह्या ३ तासाच्या शटडाऊन मुळे नागपूर महानगरपालिका  चे  नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन  हे   देखील २६ एप्रिल  रोजी  सकाळी ८ ते  ११ पर्यंत बंद राहणार आहे.  आपल्या माहितीकरिता नागपूर महानगर पालिकेच्या नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन वरून  नागपूर शहरातील  गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३  जलशुद्धीकरण केंद्र आणि गोरेवाडा तलाव  तसेच गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र  येथे कच्च्या पाण्याचा (Raw water) चा पुरवठा शुद्धीकरण करण्याकरिता केल्या जातो . त्यामुळे ह्या ३ तासामध्ये गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३  जलशुद्धीकरण केंद्र आणि  गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहे  आणि शहरातील जवळपास ३४ जलकुंभ ३ तासासाठी बाधित राहणार आहे .
तसेच  उत्तर नागपुरातील  क्षेत्रात पाणीपुरवठा बळकटीकरण करण्याच्या हेतूने नागपूरमहानगरपालिकेने अमृत योजने अंतर्गत सुगत नगर येथे  नवीन जलकुंभ निर्माण केले आहे. ह्या नवीन जलकुंभाला पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र च्या मुख्य जलवाहिनीला जोडण्यासाठी,मुख्य जलवाहिनीला पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र -८००mm व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जोडण्याकरिता,  नागपूर महानगरपालिकेने  गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्राचे १४  तासांचे शटडाऊन -बुधवार,२६ एप्रिल लाच –सकाळी ८  ते  रात्री १० पर्यंत.  घेण्याचे ठरविले आहे.  ह्या कामादरम्यान नागपूर महानगरपालिकेचे गोधनी  पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र संपूर्णपणे बंद राहणार आहे आणि त्यामुळे आशी नगर झोन ,  लक्ष्मी नगर झोन , धरमपेठ झोन , हनुमान नगर  झोन व नेहरू नगर झोन्समधील १४ जलकुंभांचा.. नारा  जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ ,  म्हाळगी नगर  जलकुंभ (हनुमान नगर झोन)  पाणीपुरवठा  पूर्णतः:  बाधित राहणार आहे. 

नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन : ३ तास शटडाऊन  बाधित राहणारे  ३४ जलकुंभ

पेंच १ जलशुद्धीकरण केंद्र : धरमपेठ झोन ( गव्हर्नर हाऊस -सीताबर्डी जलकुंभ), धंतोली झोन (वंजारी नगर -१ जलकुंभ , वंजारी नगर-२ जलकुंभ,  रेशीमबाग जलकुंभ , आणि हनुमान नगर जलकुंभ ), गांधीबाग झोन ( गव्हर्नर हाऊस -मेडिकल कॉलेज )  सतरंजीपूरा झोन ( गव्हर्नर हाऊस -बोरियापुरा  आणि सेंट्रल रेल्वे ) मंगळवारी झोन ( गोरेवाडा जलकुंभ,  गव्हर्नर हाऊस -राजनगर जलकुंभ आणि   गव्हर्नर हाऊस -सदर)   
पेंच २ आणि ३ जलशुद्धीकरण केंद्र : लक्ष्मी नगर झोन (लक्ष्मी नगर जुने जलकुंभ , गायत्री नगर जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, जयताला जलकुंभ , टाकली सिम जलकुंभ ), धरमपेठ झोन (राम नगर-१ जलकुंभ, राम नगर -२ जलकुंभ, सेमिनरी हिल्स -१ जलकुंभ, सेमिनरी हिल्स -२ जलकुंभ, दाभा  जलकुंभ, टेकडी वाडी जलकुंभ , रायफल  लाईन, फुटाळा लाईन , सिविल लाईन्स , आयबीएम लाईन) हनुमान नगर झोन (चिंच भवन जलकुंभ) , गांधीबाग झोन ( सीताबर्डी-किल्ला १ जलकुंभ, सीताबर्डी-किल्ला-२ जलकुंभ , किल्ला महाल जलकुंभ आणि बोरियापुरा जलकुंभ ), मंगळवारी झोन (गिट्टीखदान जलकुंभ)          

१४ तास  गोधनी जलशुद्धीकरण  केंद्र  शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे  १६ जलकुंभ :
नारा  जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ ,  म्हाळगी नगर  जलकुंभ (हनुमान नगर झोन), सक्करदरा -१, सक्करदरा-२, सक्करदरा -३ जलकुंभ (नेहरू नगर झोन) , हुडकेश्वर आणि नरसाळा , बोकारा  आणि  गोधनी रेल्वे 
ह्या शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे… 
अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.