नवेगाव-खैरी शटडाऊन: गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र २० फेब्रुवारी रोजी राहणार बंद
नागपूर, फेब्रुवारी 19 , 2023: नागपूर महानगरपालिका यांनी नवेगाव खैरी येथील येणाऱ्या 33 KV इलेक्ट्रिकल पॅनल वर काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी तसेच बॅक उप बॅटरी बँक इलेक्ट्रिकल पॅनल वर काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन येथे सोमवार २० फेब्रुवारी रोजी १२ तासांचे (सकाळी १० ते रात्री १० पर्यंत) शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या ह्या नवेगाव खैरी येथील १२ तासाच्या शटडाऊन मुळे गोधनी पेंच- ४ हे जलशुद्धीकरण केंद्रावरून पम्पिंग सोमवारी २० फेब्रुवारी बंद राहणार आहे., तसेच गोरेवाडा येथील पेंच-१ आणि पेंच २ ह्या जलशुद्धीकरण केंद्रातून मर्यादित पम्पिंग होणार आहे
आपल्या माहितीकरिता नागपूर महानगर पालिकेच्या नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशन वरून नागपूर शहरातील गोरेवाडा स्थित पेंच-१, पेंच २, पेंच-३ जलशुद्धीकरण केंद्र आणि गोरेवाडा तलाव तसेच गोधणी स्थित पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र येथे कच्च्या पाण्याचा (raw water ) चा पुरवठा शुद्धीकरण करण्याकरिता केल्या जातो .
ह्या १२ तास शटडाऊन मुळे नागपूर शहरातील ११ जलकुंभांचा.. नारा जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर १ आणि २ जलकुंभ , म्हाळगी नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन), हुडकेश्वर आणि नरसाळा ग्रामीण चा पाणीपुरवठा , जे गोधनी पेंच-४ ह्या जलशुद्धीकरण केंद्रावर आधारित आहेत २० फेब्रुवारी रोजी पूर्णपणे बाधित राहील. तसेच गोरेवाडा येथील पेंच-१ आणि पेंच २ ह्या जलशुद्धीकरण केंद्रातून अंशत: पम्पिंग होणार असल्याने त्यावर आधारित पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम नागपुरातील जलकुंभांना कमी दाबाने व मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे*. पाणीपुरवठा दि २१ फेब्रुवारी (मंगळवारी ) त्या त्या जलकुंभ भागातील वेळापत्रकानुसार सुरळीत होईल.
ह्या १२ तास शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता …पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे…