निर्यात केलेल्या वाहनांमध्ये 6 एअरबॅग; भारतीय युनिट्समध्ये फक्त 4 का? -नितीन गडकरीचा कार निर्मात्यांना प्रश्न
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इकॉनॉमी कारच्या निर्मात्यांना प्रश्न विचारला आणि ते म्हणाले,कार निर्यात करायची असताना त्यात ६ एअरबॅग्स लावणाऱ्या कंपन्या तिच कार देशात विकायची असताना त्यात केवळ ४ एअरबॅग्ज लावतात. गरिबांचा जीव वाचवणं महत्त्वाचं नाही का? त्यांच्या जीवाला काहीच मोल नाही का? असे प्रश्न गडकरींनी उपस्थित केले आहेत. आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या गडकरींनी इंडिया टुडेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एअरबॅग्जवरून कंपन्यांना प्रश्न विचारला.
ते म्हणाले की इकॉनॉमी कारच्या निर्मात्यांनी दिलेला युक्तिवाद म्हणजे एअरबॅगची संख्या वाढल्याने वाहनांच्या किंमतीवर लक्षणीय परिणाम होईल. ते पुढे म्हणाले की वाहनातील एक एअरबॅग वाढवण्याची किंमत 900 रुपयांपर्यंत कमी असू शकते. वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्यपणे बसवण्याची प्रक्रिया आधीच सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचं रस्त्याचं जाळं भारतात आहे. मात्र तरीही आपल्याला रस्ते सुरक्षेसाठी बरंच काम करणं गरजेचं आहे, असं गडकरी म्हणाले. ‘दरवर्षी देशभरात ५ लाख अपघात होतात. त्यात दीड लाख जणांचा मृत्यू होतो. यापैकी ६५ टक्के जण १८ ते ३४ वयोगटातील असतात,’ अशी आकडेवारी त्यांनी सांगितली.