या वेळी वाढदिवस सोहळा नको: नितीन गडकरी
नागपूर:- कोवीड१९ चे थैमान, त्यायोगे संक्रमण टाळण्या अनिवार्य सलग संचारबंदी या सर्वामुळे कैक लोक जगभर प्रभावित आहेत, रोजगाराची वानवा, खाण्याची भ्रांत अशांचे मदतीस कार्यकते व्यस्त आहेत, या प्रसंगी वाढदिवस साजरा करणे उचित नाही त्यामुळे सर्व हितचिंतक, मित्र परिवार, कार्यकर्ते, नेत्यांस नम्र विनंती कि अशा खडतर प्रसंगाचे गांभीर्य बाळगत माझा वाढदिवस साजरा करण्यास.
अभिनंदन देण्यास वैयक्तिकरित्या भेटीस येऊ नये, ज्यायोगे संचारबंदी नियमांचे उल्लंघन, सोशल डिस्टंसींग पालनात व्यत्यय येईल असे कृपया टाळावे, याऐवजी आपापले विभागांत गरजूंचे मदतीस लागावे, आपले प्रेम व सदिच्छा माझ्यासोबत सदैव आहेतच, याची मला जाण असल्याचे केंद्रिय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आपल्या वाढदिवस पुर्वसंध्येवर माध्यमांस सांगीतले.
यावर्षी कसलाही खर्चीक जन्मदिन सोहळा ठेऊन एकत्र जमू नये हि नम्र विनंती. शासनाच्या लॉकडाऊन संंबंधीत नियम, अटिंचे काटेकोर पालनावर भर द्यावा, घरातच राहून स्वत:ची व सर्वांची सुरक्षिततेची काळजी घ्यावी, लॉकडाऊन पश्चात मी वैयक्तिकरित्या भेट देईलच, तोवर जबाबदारी बाळगा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले