दिक्षाभुमी विकास कामांचा उर्वरित निधी तत्काळ देण्याचे ना. गडकरी यांचे निर्देश
नागपूर: जगभरातील बौद्ध भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमी स्तूपाचे नूतनीकरण देखभाल दुरुस्ती आणि परिसरातील इतर विकास कामांकरिता नितीन गडकरी यांनी उर्वरित निधी देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. केंद्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनने सुमारे साडे नऊ कोटीचा निधीस जानेवारी 2016 मध्ये मान्यता दिली होती, पैकी चार कोटी एकोणसत्तर लाखाचा निधी त्याच वर्षी मंजुर करण्यात आला व जिल्हाधीकारी कार्यालयास सुपुर्द करण्यात आला. असे असतांना नोडल एजेंसी ने प्रत्यक्षात जुन 2018 ला कामाचे कार्यादेश जारी केले.
फेब्रुवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन कामाची पाहणी केली तेव्हा उर्वरित निधी मिळावा यासाठी त्यांनी लक्ष वेधले, कोरोनाच्या काळामध्ये काम ठप्प होते याकडेही नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यात आले. गडकरी यांनी पुढाकार घेऊन उर्वरित निधी तातडीने जारी करण्याचे आदेश दिले आहेत.