12 दिवसानंतरही बीजांकुर नाही: शेतक-याचा कुटुंबासह आत्महत्येचा इशारा
नागपूर:- महाराष्ट्रात बनावट बियाण्यांचे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाहीय, सतत बनावट बियाणांची प्रकरणे कुठे ना कुठून पुढे येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा नेते देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्यातील शेतकर्यांच्या त्या शेतात पोहोचले ज्याच शेतकर्यांनी बियाणे पेरलीयत, पण ते अद्याप अंकुरले नाहीत, शेतक-यांनूसार बनावट बियाण्यांचाच हा प्रताप आहे, पेरल्यानंतरही बियाणे अंकुरले नाहीत.
आता अशी प्रकरणे नागपूरच्या ग्रामीण भागातूनही येत आहेत, नागपूरच्या पारशिवनीच्या नीलज खेड्यात, सचिन दुपारे नावाचा शेतकरी सांगतो की मी अंकुर कंपनीचे नंबर 335 सोयाबीन बियाणे विकत घेतले होते, मात्र 10 -12 दिवस झालेयत परंतु रोपे बाहेर पडली नाहीत, बिया जमिनीखालीच आहेत, त्यात सुपीक क्षमता नाही, बियाणे मातीच्या बाहेर आले नाहीत, म्हणून कंपनीकडे तक्रार केली पण कंपनीने म्हटले आहे 8-10 दिवस आणखी वाट पहा, त्यानंतर पाहू! दुकानदार काहीच बोलणार नाहीत माझी 3 मुले आहेत, मी कर्ज घेऊन शेती कशी करेल, ज्या कंपनीची आणि ज्या दुकानातून बियाणे घेतले गेले होते त्यांची वर्तणूक टाळाटाळीची आहे अशा परिस्थितीत शेतकरी सचिन आपल्या कुटुंबासमवेत दुखावला गेलाय. व आत्महत्येच्या गोष्टी करतोय