सरकारमध्ये सर्वच सुरळीत नाही: कॉंग्रेस नेते भेटताहेत मुख्यमंत्र्यांना
मुंबई:- शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये वारंवार अस्वस्थतेचा देखावा पुढे येत आहे. आघाडी सरकारमधील भागीदार असलेल्या कॉंग्रेसने महत्त्वपूर्ण निर्णय आणि महत्त्वाच्या बैठकीत आपला सहभाग नोंदविण्याची मागणी केलीय. या संदर्भात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, नुकतीच कोरोना व चक्रीवादळ निसर्गविषयक चर्चासाठी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पण त्यातून कॉंग्रेसला वगळले जात असल्याची भावना बळावली असल्याचे जाणवतेय.
कॉंग्रेसचे एका मंत्र्यांनूसार, ‘काही मुद्द्यांवरून पक्षात नाराजी आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढायचा आहे.’ गतवर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा तीन-पक्षीय सरकार स्थापन झाले आणि मंत्रीपरिषदेची शपथ घेतल्यानंतर सत्ता आणि जबाबदा-या समान वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला, पण तसे पालनाचा अभाव जानवतो. करिता प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पीडब्ल्यूडी मंत्री अशोक चव्हाण सोमवारी ठाकरे यांची भेट घेतील. राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या उमेदवारी, राज्यस्तरीय मंडळ आणि महामंडळांच्या नेमणुका, कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या अडचणी यावर दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, असे समजते.