जुना भंडारा रोड अद्यापही दुर्लक्षीत
नागपूर:- महालातील केळीबाग रोड २४ मीटर रूंदिकरणाचे काम गेल्या आठवडाभर जोमात सुरू झाले पण त्याप्रमाणेच जूना भंडारा रोड जो 7/1/2000 लाच मंजूर झाला होता, हायकोर्टाचे तसे आदेश झाले आहेत याबाबत केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांना मध्य नागपूर विकास आघाडी तर्फे वारंवांर लेखी निवेदन व प्रत्यक्ष भेटीत हायकोर्टाचे आदेश प्रत देण्यात आले आहेत त्यांनीही आयुकत तथा प्रशासना सोबत मिंटीग घेऊन आदेश दिले आहेत, 21 वर्षे होत आहेत नागपूर स्मार्ट सिटीचे प्रगतीसाठी व विकासासाठी घोषणा वारंवार झाल्या पंरतु डीपी रोड साठी हायकोर्टाचे आदेशाचे पालन झाले नाही केळीबाग रोड साठी काम त्वरीत झाले.
भूमीअधिग्रहण प्रक्रीयाही तडकाफडकी नूकतीच झाली पंरतु जूना भंडारा रोड (मेयो हाॅस्पीटल ते शहीद चौक सूनील हाॅटेल) या रोड वरील 41 नागरिकांना मोबदला मिळाला मनपा, नझूल, एन आय टी ची जागा मिळून 199 जागा क्लियर झाल्या आहेत तरी आजपावेतो 40 महीने झाले रोड साठी जागा भूसंपादन प्रक्रिया सुरू झालेली नाही असा प्रश्न विचारला जात आहे मेयो हाॅस्पीटल ते सुनिल हॉटेल असा २.५ कि मीटर व ६० मीटर रूंदिकरणाचा प्रस्ताव मार्ग आहे, रूंदिकरणात ५८७ प्रापर्टी चा भाग तुटतो, आतापावेतो ४१ प्रापर्टी धारकांना मोबदलाही दिला गेलाय तर १५८ प्रॉपर्टी नझूल एन आय टी मनपा चे ताब्यात आहे १९९ प्रॉपर्टी क्लियर असतांना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.