प्रथम नागपुर आगमनानिमित्त सुभाषजी पारधींचे रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत.
राष्ट्रीय अनूसूचित जाती आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ति झालेनंतर सुभाष जी पारधींचे,आज प्रथम नागपुर आगमन झाले. याप्रसंगी विविध संस्था, संगठना व पदाधिकारायांनी रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत केले. यात सेंट्रल रेल्वे व दपूम रेल्वे अनुसूचित जाती कर्मचारी संघटना तसेच भाजपा अजा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, प्रदेश सचिव श्री सतिश सिरसवान, नागपुर शहर अध्यक्ष श्री.राजेश हातीबेड, ग्रामीण चे अध्यक्ष श्री. अंबादास जी उके, महामंत्री श्री. सुरेंद्र शेंडे.
भाजपा शहर मंत्री अॅड. राहूल झामरे, उत्तर मंडळ उपाध्यक्ष धनंजय कांबळे;मोर्चा मंडळ अध्यक्ष सर्व श्री. बाला वानखेडे, तुषार लारोकर, नगरसेवक श्री. लखनजी येरावार, रोहन चांदेकर, शंकर मेश्राम, संजय कठाळे,इंद्रजित वासनिक इ. प्रमाणात उपस्थित होते.
यानंतर त्यांनी संविधान चौकात जाऊन परमपुज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुढील दोन दिवस त्यांचा मुक्काम हा रवि भवन काॅटेज क्रमांक 8 मध्ये राहणार असून तेथे ते अजा समुह व पिडीतांच्या तक्रारी व निवेदनाचा स्वीकार करतील.