ऑपरेशन लोटस सुरु..ठाकरे सरकार धोक्यात; एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार!
राज्यात ऑपरेशन लोटस सुरु झाले असून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 30 हून अधिक आमदार आता भाजपच्या गळाला लागली आहेत. येत्या दोन दिवसात सत्तापालट होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंडखोर आमदार पळून महाराष्ट्रात जावू नये यासाठी मंगळवारी उशिरा सुरतमध्ये राहिलेल्या आमदारांना आसाममधील गुवाहाटी येथे हलवण्यात आले. त्यासाठी रात्री उशिरा सर्व आमदारांना बसमधून विमानतळावर नेण्यात आले.
अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या काही आमदारांची नावे समोर आली आहे. यामध्ये ईडी, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागलेले प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांचाही समावेश आहे.
1. प्रताप सरनाईक
2. श्रीनिवास वनगा
3. अनिल बाबर
4. नितिन देशमुख
5. लता सोनवणे
6. यामिनी जाधव
7. संजय शिरसाट
8. महेंद्र दळवी
9. भारत गोगवले
10. प्रकाश सर्वे
11. सुहास कांदे
12. बच्चू कडु , प्रहार पार्टी
13 नरेन्द्र बोंडेकर , अपक्ष आमदार अमरावती
14 संजय गायकवाड़
15 संजय रायमूलकर
16 बालाजी कल्याणकर
17 रमेश बोरनारे
18 चिमणराव पाटील
19 किशोर पाटील
20 नितीनकुमार तळे
21 संदीपान भुमरे
22 महेंद्र थोरवे