मनमानी वीज बिलाला विरोध: भाजपचे नगारा आंदोलन
नागपूर:- लॉकडाऊनच्या कालावधीत लोक बंदिस्त राहिले. खासगी क्षेत्रातील नोकरदारांच्या पगारात मोठी कपात झाली. संसर्गाच्या भीतीमुळे लोकांनी उन्हाळ्यात एसी-कुलर वापरला नाही, मात्र महावितरणद्वारे लोकांना तीन महिन्यांच्या बिलातून हजारो रुपये द्यावे लागतायत. ही बिले रद्द करून सुधारित बिले पाठविण्याच्या उद्देशाने भाजपने शहराच्या चौकाचौकांत आंदोलन केले. गोळीबार चौकात शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने अधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ते म्हणाले की ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चुका सुधारण्याऐवजी, नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारकडे बोट दाखवले. राज्यातील शेतकर्यांचे शेतमाल खरेदीसाठी राज्य सरकार केंद्राकडे पाहत आहे. जर असे प्रत्येकच गोष्टीसाठी केंद्राकडे टक लावून बसले असाल तर सरकारने राज्यपालांकडे राजीनामा द्यावा. या वेळी महापौर संदीप जोशी, आमदार गिरीश व्यास, अनिल सोले, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, मंडळाचे अध्यक्ष किशोर पलांदुरकर, विनोद कान्हेरे, संजय अवचट, देवेन दस्तूर, संजय चौधरी, भोजराज डुंबे, संजय ठाकरे, संजय बंगाले, राम अंबूलकर, सुनील मित्रा उपस्थित होते.
सत्तेवर बसण्याचा हक्क नाही: दटके म्हणाले की अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, जे संकटाच्या वेळीही नागरिकांना लुबाडण्याचे काम करतेय. चुकीचे बिल रद्द करत दुरुस्त करून ते पाठवा. या बिलांत एप्रिलमध्ये वाढविण्यात आलेला 7 टक्के वीज दर, एक वर्षासाठी रद्द करावा, अधिभार व व्याज रद्द करा, ऑनलाईन भरलेली रक्कम दुरुस्तीची बिले पाठवा. अन्यायकारक बिलं दुरुस्त होईपर्यंत जनआंदोलन सुरूच राहणार आहे.
दुकाने, कार्यालय बंद, मग इतके बिलं कसे?
भाजयुमो अध्यक्ष व्हेरायटी चौकात शिवानी दानी यांच्या नेतृत्वात ढोल वाजवून सरकारचा विरोध केला गेला. त्यांचेनूसार तीन महिने लॉकडाऊनमध्ये सर्वच दुकाने, कार्यालये, कारखाने व उद्योग बंद राहिले, परंतु या काळातले बिलं हजारो रुपयांचे, वाढिव महावितरणने पाठविले आहे. दुकाने बंद, वीज वापर नाही, तरीही विजेचे बिल सामान्यपेक्षा कित्येक पटीने अधिक पाठविले गेले. हे कसे शक्य आहे, उर्जामंत्री शहराचे आहेत, परंतु नागरिकांची दखल घेतली जात नाहीय हे दुर्दैव आहे. कान उघाडणीसाठीच नगारा आंदोलन केले जात आहे. यावेळी राहुल खंगर, कमलेश पांडे, सारंग कदम, आलोक पांडे, दिपांशु लिंगायत, वैभव चौधरी, सचिन करारे, नेहल खानोरकर, रितेश रहाटे, सुबोध आचार्य, जितेंद्र सिंग ठाकूर उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.
जनतेवर अन्याय: भाजपा अजा मोर्चाचे वतीने कमाल चौक येथे धर्मपाल मेश्राम यांचे नेतृत्वात नगारा बजाओ चळवळ करण्यात आली. ते सांगतात कोरोना संकटात एकीकडे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसमोर गंभीर आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे. अशा संकटाच्या वेळी दिलासा देण्याऐवजी सरकारतर्फे जनतेला लुबाडण्याचे काम केले जात आहे. मनमानी वीजबिल पाठवून नागरिकांवर अन्याय होत आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन कालावधीच्या 3 महिन्यांचे वीज बिल पाठवले जाणार नाही सांगीतले परंतु हे सरकार तर लूट करीत आहे. मिलिंद माने, संदीप जाधव, अशोक मेंडे, सुभाष पारधी, भोजराज डुंबे, संजय चौधरी, प्रभाकर येवले, अमर बागडे, संदीप गवई, विजय चुटेले, लखन येरवार, महेंद्र धनवीजय, हरीश दिकोंडवार, उषा पॅलेट, निरंजन पाटील, सतीश शिरसवान, राहुल जांबरे, विशाल लारोकार, मनीष मेश्राम, राहुल मेंढे, शंकर मेश्राम, अजय करोसिया, संदीप बेले, बंडू गायकवाड, इंद्रजित वासनिक,विजय फुलसुंगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनात मोठा जमाव: शहरातील अनेक मुख्य चौकांमध्ये मोठ्या संख्येने जमावात कार्यकर्त्यांनी नगारा बजाओ आंदोलन केले. गोळीबार चौकातील श्याम चांदेकर, लॉ कॉलेज चौकात कल्पना पांडे, प्रदिप बिबटे, अवस्थी चौकात अजय पाठक, गिट्टीखदान चौकात माया इव्हनाते, शेखर येटी, नंदनवन चौकात रमेश वानखेडे, दोसर भवन चौकात लाला कुरेशी, शहिद चौकात भाजपा व्यवसाय आघाडीचे शहराध्यक्ष संजय वाधवानी, बैद्यनाथ चौकात जयसिंग कच्छवाह, प्रतापनगर चौकात भोलेनाथ सहारे, कॉटन मार्केट चौकात राम कोरपे, पुंडलिक सावंत, सक्करदरा चौकात संभाजी भोसले, पियुष अंबुलकर, गड्डीगोदाम चौकात विकास फ्रांसीस, रामनगर चौकात पीएसएन मूर्ती, संदीप पिल्ले, तर संविधान चौक येथे नचिकेत व्यास यांनी जनआंदोलनाचे नेतृत्व केले.