उत्तर नागपूरात आपचे ऑक्सिमिटर अभियान आयोजित
नागपूर: covid-19 पासून बचाव करण्यासाठी आप’ तर्फे जनजागृति अभियान सोमवारी उतर नागपूरातील विद्या नगर येथे आयोजित करण्यात आले.
विद्या नगरातील व अन्य ठिकाणी आम आदमी पक्षाच्या पिंकी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत घरोघरी जाऊन या वेळी नागरिकांची ऑक्सिजनची तपासणी केली व तत्संबंधी मार्गदर्शन केले.
कोरोना प्रसार रोखथामासाठी जनजागृतीसाठी आम आदमी पार्टी नागपूरचे कार्यकर्ते थेट जनतेशीच संपर्क साधत आहेत. शहरात कोरोना वाढ चरम पदावर आहे आणि यामध्ये आरोग्य यंत्रणा ही कुठेतरी अडखळत आहे, त्यास हातभाराकरिता आणि प्रसाराचा वेग पाहता पक्षप्रमुख व दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिमिटर वापर व ऑक्सिजन पातळी तपासणी गरजेची असल्याने त्यास अनुसरून कार्यकर्ते घरोघर तशी ऑक्सिजन पातळी तपासत आहेत ज्यायोगे कुणाची पातळी कमी आढळताच त्यास योग्य आरोग्य सुविधा उपचारांचे निर्देश दिले जाऊन जीव वाचविले जाऊ शकतात.
याच उद्देशाने घरोघरी जाऊन ऑक्सिमिटर वापरत ऑक्सिजनची पातळी तपासणी केली जात आहे, या पद्धतीने सुरू हि मोहिम एक चांगला उपक्रम ठरतो आहे.