कहर कायम: नागपूरात पुन्हा उद्रेक, एकाच दिवसात 86 पॉझिटिव्ह
नागपूर:- ऑरेंजसिटीतले समुह संक्रमण प्रशासन कदाचित नाकारत असेल. पण मोमीनपुरा. सतरंजीपुरा आणि आता नाईक तलावमध्ये ज्या प्रकारे रुग्णसंख्या वाढती आहे त्यावरून कैक वस्त्यांत हे पसरत असल्याचे दिसते. एकट्या नाईक तलाव परिसरात आजवर दीडशेाहून अधिक लोक सापडले आहेत. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत 700 हून अधिक लोकांना विलग ठेवण्यात आले आहे. काल आलेल्या 86 रुग्णांच्या अहवालात नाईक तलावच्या 72 लोकांमध्ये संसर्गाची खात्री झालीय. यासह शहरातील रुग्णांची आतापर्यंतची संख्या 863 वर पोहोचली. डॉक्टरांनी येत्या काही काळासाठी ‘सतर्कता’ जारी केली असून ही संख्या वेगाने वाढण्याचे संकेत दिले आहेत. हेच कारण आहे की आता लोकांनी स्वत:चे रक्षण स्वत:च करण्याची वेळ आली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत वाढ: कालची संख्या आतापर्यंतचा विक्रम बनला आहे. प्रथमत:च एकावेळी 86 रुग्णांमध्ये संक्रमणाची खात्री झाली आहे. मंगळवारचेही एकूण 43 रुग्णांत जास्त नाईक तलावमधीलच होते डॉक्टरांना संशय आहे की गृहविलगीकरणात ठेवलेले लोक नियमांचे पालन करीत नाहीत. यामुळेच परिसरात मोठ्या संख्येने हा प्रसार होत आहे.
वस्त्यांत फैलाव: नाईक तलावसह 6 रुग्ण सतरंजीपुरा आणि 7 ईसासनी हिंगणा येथे आढळले. हिंगणा रोड आणि हिंगणा येथेही आजार वेगाने पसरतो आहे. आतापर्यंत इसासानीमध्ये रुग्ण आढळले नाहीत. पण ज्या प्रकारे साखळी वाढत आहे. असे दिसते की संसर्गग्रस्त फिरून इतरांनाही आजारी करीत आहेत, डॉक्टरांचे मते याचे मुख्य कारण म्हणजे पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. असो, लॉकडाऊनमधून सुटताच लोकांनी सर्वत्र फिरण्यास सुरवात केली आहे. बरेच अद्याप मास्कविना फिरताहेत. म्हणजे जे अपेक्षित होते ते तिथेच घडत आहे. इतकी जागरूकता करूनही पाणि पालथ्या घड्यावरच पडले.
दरम्यान, मेयोमधील 12 आणि मेडिकल चे 4 जणांना बुधवारी सुट्टी देण्यात आली. परंतु प्रत्येकास गृहविलगीकरणाचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासह आतापर्यंत एकूण 507 लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. डॉक्टरांनुसार परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे. बहुतांश रूग्णांत लक्षणे नाहीत त्यामुळे सुधारास सकारात्मकता मिळते. पण भविष्यात काय परिस्थिती असेल ते सांगता येत नाही. करिताच नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे.
कालचे तारखेपर्यंत:
- एकूण संक्रमित 863.
- बुधवारी 83 पॉझिटिव्ह
- आतापर्यंत 15 मृत
- 1851 विलगीकरणात
- 398 गृह विलगीकरणात
- 507 सुटी दिली