व्यक्तिश: नव्हे तात्विक विरोध, बदलीमागे सरकारच : महापौर जोशीं
नागपूर: काल आयुक्त मुंढे यांची बदली झाली त्यानंतर सर्वसामान्य जनतेत अनेक प्रश्नचिन्ह उमटले, ते सोशल मीडियाद्वारे सहज प्रतिक्रिया रूपांत पाहायलाही मिळाले. मुंडे हे “राजकारणाचा बळी’, ‘जोशी जिंकले’ वगैरे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या पण या दरम्यान महापौर जोशी यांचेवर सतत विचारणांचा पाऊस पडत होता, अशातच त्यांनी जनसंवादाद्वारे काही प्रश्नांची उत्तरे दिली. त्यातील पहिला प्रश्न अर्थातच मुंडेंना हलवण्याबाबत च्या “राजकी खेळी”चा होता. पण जोशी यांनी त्यास सपशेल नकार देत या मुद्द्यात काही तथ्य असल्याचे नाकारले.
जनसंवाद माध्यमातून महापौर जोशी यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले की मुंढे यांचे बदली संदर्भात त्यांचेवतीने कसलाही राजकीय दबाव वा वजन वापरले नाहीय, प्रत्यक्षात अशा बदलीचे अधिकार स्थानिकांना नाहीत. राज्य सरकार अशा बदली करते व मुंढे हे एकमेव बदली झालेयत का? महाराष्ट्रात काल रोजी १६ प्रशासकीय अधिका-यांची हालवाहालव झाली आहे, पर्यायाने ती मुख्यमंत्र्यांचे अखत्यारीत येते माझा व त्यांचा राजकीय पक्ष निराळा, पक्षीय ध्येयधोरणं निराळी. अशात आम्ही म्हणू ते होईलच का? हे सा-यांनी समजून घ्यावे
दुसरा मुद्दा म्हणजे सर्व व्यापा-यांची कोरोना तपासणी बंधनकारक यास माझा विरोध का? तर अशी तपासणी करवून घ्यायला हा विरोध नव्हता, फक्त मुदतीत सगळ्याच म्हणजे तब्बल पाच लाख व्यापारी कर्मचारी या सर्वांची कोरोना तपासणी हे काही तडकाफडकी होणारे काम नाही ना! मग यावर ज्यांना लक्षणे आहेत त्यांनीच ही तपासणी करावी असा उतारा आला. पण ते ही सहज आहे का? व्यापाऱ्याला दिवसभरात कित्येक ग्राहक भेटीस येत असतात तपासणी केल्यानंतर २ तासांनी पुन्हा तो बाधित होऊ शकतो, तपासणीत तो बाधीत नाही पण दिवसभरात होणारच नाही याची खात्री आहे का? याशिवाय व्यापाऱ्यांनी तपासणी खाजगी मध्येच करावी आहे हा आग्रह चुकीचा नाही का? पाच लाख लोक ₹1900 तपासणी म्हणजे 95 कोटी खाजगी लॅबोरेटरीजना देणे ही भूमिका योग्य होती का?
आधीच लॉकडाउन ने खचलेला पिचलेला हा वर्गच भुर्दंड का भरेल, सोसेल अशी माझी भूमिका होती, त्या भूमिकेस धरून मी हा खुलासा दिला होता. हा चुकीचं वाटत असेल तर काय बोलावे