पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मध्यवर्ती कारागृहात दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन
नागपूर: मध्यवर्ती कारागृह येथे शुक्रवारी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे शुभहस्ते दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अधीक्षक श्री अनूप कुमार कुमरे आणि कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कारागृहातील बंदिवानांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू व साहित्याचे प्रदर्शन व त्या वस्तू विक्री करिता येथे ठेवण्यात आलेल्या आहेत.
या सर्व साहित्यांची पोलीस आयुक्तांनी पाहणी करून बंदिवानांच्या कलात्मक हस्तकौशल्यची प्रशंसा केली. अनुप कुमार कुमरे यांनी प्रदर्शनाबाबत पोलीस आयुक्तांना विस्तृत माहिती दिली, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना याप्रसंगी दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रतिक्रिया देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले की, आज कारागृह विजीट दरम्यान येथे तयार करण्यात आलेले कलात्मक वस्तू व त्याचे जे प्रदर्शन केले गेलेय हा एक चांगला असा उपक्रम आहे. विक्रीसाठीही तयार केलेले हे साहित्य उत्कृष्ट व उच्च दर्जाचे भासते, मास्क, लाकडी कलात्मक वस्तु असो वा फॅब्रिकचे काम सर्वच उत्कृष्ट आहे.
एस पी कुमरे साहेब आणि त्यांचे संपूर्ण कर्मचारी वर्ग यांनी मेहनतीने शिकवण्यासाठीचे घेलेलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहे, क्या बंदिजनांचेही कौतूक जे हे सर्व शिकले आणि त्यांनी या कलापुर्ण वस्तू तयार केल्या, त्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा. कारागृह संबंधित जी कामे पोलिस आयुक्तालयाला समन्वयाने करण्याची गरज आहे त्याबद्दलही अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगीतले. कारागृह हे महत्वाचे शिक्षण स्थान आहे आणि स्थानिक पोलीस, नागपूर सिटी पोलीस आणि कारागृह प्रशासन मिळून बंदीजनांचे काही अडीअडचणी राहील त्या निवळण्यास सहकाराने कार्यरत असतील.