सकाळी पॉजिटिव्ह, दुपारी निगेटिव, संध्याकाळी सुट्टी: कोरोना हाताळणीत आता गंभीरता उरली नाही
नागपूर:- आता शहरात कोरोना रूग्णांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की केवळ गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांवरच सरकारी आणि मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्यांस सामान्य लक्षणं किंवा लक्षणांशिवाय कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांना घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्यासाठी घरात स्वतंत्र विलगीकरणाची व्यवस्था नाही अशा लोकांसमोर समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना खाजगी लॅब किंवा रुग्णालयात जाण्यास भाग पाडले जाते. जेथे ते लुटीस बळी पडत आहेत.
आमदार कृष्णा खोपडे सांगतात, बरेच रुग्ण तर असेही आढळून आले आहेत ज्यांचा अहवाल सकाळी खासगी लॅबमधून पॉजिटिव्ह आला आणि जेव्हा ते सरकारी रुग्णालयात पोहोचले तेव्हा दुपारी हा अहवाल नकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांना संध्याकाळी घरी जाण्याचीही परवानगी देण्यात आली. खोपडे म्हणाले की, लॅब आणि डॉक्टरांच्या या मनोवृत्तीमुळे शहरातील कोरोनाबाबत तीव्र संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयात लोकांची लूट केली जात आहे.
चाचणी वेगवेगळ्या दराने: खासगी रुग्णालयांत लूट असल्याचे चित्र आहे. 600-700 रुपये च्या पीपीई किटचे 24 तासांत 4 किट रूग्णांचे बिलामध्ये जोडले जाताहेत. बेडचार्ज 9000 ते 25000 रुपये लुटण्यात येत आहे. इतकेच नाही तर वेगवेगळ्या खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी 750 ते 300 चार्ज घेण्यात येत आहेत. एकाच चाचणीसाठी वेगवेगळे लॅब वेगवेगळे चार्ज कसे आकारू शकते, असा सवाल खोपडे यांनी केला आहे. मनपा डॉक्टर सामान्य पॉजिटिव्ह रूग्णांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला देत आहेत, चाचणी न करता त्यांना घरी पाठवले जात आहे. असा आरोप त्यांनी केला.
कळमेश्वर रोडवरील 5 हजार खाटांच्या कोविड सेंटरची स्थापना करण्यात मनपा आयुक्तांनी सुसज्जित असल्याचा दावा केला होता का? त्या केंद्राचे काय झाले? त्याचा वापर का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता रूग्ण हजारोंच्या संख्येनत पोहोचले आहेत, त्यामुळे कोणतीही पर्यायी व्यवस्था का केली गेली नाही. यापूर्वीही अनेक रुग्णालयांमध्ये पॉजिटिव्ह रूग्ण सापडल्यामुळे रुग्णालये सील केली गेली पण गेल्या महिन्यात झोन-8 मधील एका रुग्णालयात पॉजिटिव्ह आढळूनही ते रुग्णालय अजून का कार्यरत आहे.
मार्गदर्शक तत्त्वे जारी करा: कोरोनाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण केली आहे. काय करावे, कोठे गेले पाहिजे यावर मार्गदर्शक तत्त्वे नियमितपणे दिली जावीत. या क्षणी अशी स्थिती आहे की रुग्ण फोनवरून मनपाला माहिती देतात, त्यानंतर 2-3 दिवसांनी मनपांची टीम त्यांच्या घरी पोहोचते. या दरम्यान नागरिक त्रस्त असतात. त्यांचे प्रश्नाचे निराकरणास प्राथमिकता असायला हवी