नागपूरात कोरोना दुस-या लाटेची संभावना
नागपूर: उपराजधानी नागपूर मध्ये कोरोना महामारीच्या संक्रमणाची दुसरी लाट येण्याची संभावना व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याची निश्चित वेळ वा कालावधी कधी राहील याला घेऊन अनेक अनिश्चितता असल्याचे चित्र आहे. सणासुदिंचा मोसम सुरू झालेला आहे, त्यामुळे संदेह व्यक्त केला जात आहे की संक्रमणाची प्रकरणं अजूनही एक वेळा वाढू शकतात, परंतु जाणकारांचे मते एक बाब सुखावह आहे की नागपूर मध्ये प्रथम लाटेवेळी जशी स्थिती बिघडली होती तशी ती असणार नाही, पूर्व मध्ये जितकी भयावह स्थिती झाली होती तशी गंभीर असणार नाही कारण यंत्रणाही आता ब-याच प्रमाणात दक्ष आहे.
देशात कोरोनाचे प्रकरणांची दुसरी लाट बरेच जागी आढळली गेली, देशातील राजधानी दिल्लीमध्ये तर तिसरी लाट येण्याची गोष्ट केली जात आहे, यातच उपराजधानी नागपूरात दुस-या लाटेची शक्यता वर्तवल्या जात आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याबाबत घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
ते सांगतात कि याबाबत बहुसंख्य चर्चा केल्या जात आहे, कालावधीबाबत मत मतांतरे आहेत कुणी नोव्हेंबर शेवटास तर कुणी सांगतय डिसेंबर अंतास वा काही जानेवरी पर्यंतही शक्यता सांगत आहेत. यात कसलीच एकवाक्यता नाही, तरी जेव्हाही अशी लाट येईल प्रशासन तयारीत असेल, जे आपण करू शकतो आपण त्यास्तव सजग राहू. जे आपल्या हाती नाही त्याबाबत विचारात का वेळ खर्च करावा?
दुसरी बाब म्हणजे लाट सर्व जागी येत आहे, जशी यूरोपात आढळली, दिल्लीची गोष्ट चालू आहे कि तेथे तृतीय लाट सुरू आहे यावरून आपणाकडेही यांचे पडसाद येतील, काही आकडेवारीत वाढ आढळेलच अशांत जितकी सजगता राखल्या जाईल तितका त्या लाटेचा चरम रोखण्यात हातभार लागेल. तिच्या फैलावात रोखथाम होईल, करिताच मास्क वापर, सोशल डिस्टेंस पालन व सॅनिटायजेशनसह हस्तप्रक्षालन ही सवय व्यवस्थीत कायम राखल्यास आपण सारे मिळून यातूनही मार्ग काढू.