दाभाच्या 3 लेन सील: कोरोना संसर्ग वाढ
नागपूर:- शहरात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना संक्रमणादरम्यान दाभा येथील एका महिलेचा अहवाला पॉझिटिव्ह आल्याचे वृत्तामुळे परिसरात खळबळ उडाली. अशा परिस्थितीत पालिका अधिका-यांनी बुधवारी दाभा परिसरातील वैभवनगरच्या 3 लेनला सील केले. त्याचवेळी स्थानिक नगरसेविका दर्शनी धवड यांनी दक्षतेचे पालन करून लोकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सदर परिसरातील एका वृद्ध महिलेला कोरोना संसर्गाची खात्री झाल्यानंतर, तिच्या कुटुंबातील 9 सदस्यांना खबरदारी म्हणून व्हीएनआयटी विलगीकरण केंद्रामध्ये दाखल केले गेले. बुधवारी दाभाचे वैभवनगरसह 3 परिसर सील करण्यात आले. यामध्ये योगेश्वरनगर आणि आरोही अपार्टमेंटचा समावेश आहे.
यावेळी नगरसेविका देखील उपस्थित होत्या. लोकांशी चर्चा करतांना त्यांनी सांगितले की कोरोनाला घाबरण्याऐवजी याविषयक काळजी घेणे आवश्यक आहे. वृद्ध आणि मुलांनी घराबाहेर पडू नये, जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यासह बाधित भागात स्वच्छताही करण्यात आली.