ऑनलाईन ॲपवर सुरू देहविक्रीचा भंडाफोड: गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर: इंटरनेटच्या सहाय्याने चालणारे अँड्रॉइड फोन ॲपवर मुली पुरवण्यासाठीची असलेली एक अॅप गुन्हे शाखा पोलिसांचे रडारवर आली, याद्वारे व्हायरल होत असलेल्या एका मेसेजचा तपास करत व दिलेल्या यावरील नंबर वर संपर्क साधत या संपूर्ण यंत्रणेचाच भंडाफोड करत गुन्हे शाखेने सर्व संबंधितांना अटक केली आहे. मनीष नगरातील पुरुषोत्तम बाजार येथे या अॅपचे ऑफिस कार्यरत होते.
मनीष नगरातील वर्दळीच्या ठिकाणी असणारे सुपर बाजारातील इमारतीचा या कार्यालयाने वापर केला, बिनबोभाट बेकायदा कृत्य आरोपी चालवत होते. गुन्हे शाखेने आज धाड टाकून उपस्थितांना व संबंधितांना अटक केली आहे.
परराज्यातील दोन मुली व एजंट म्हणून काम करणारे तीन असे ताबडतोब या स्थळावरून अटक करण्यात आली.
दोन आरोपी अहमदनगर येथील रहिवासी असून तिसरा नागपूरचा स्थानिक यांना मदत करायचा, अटक केलेल्या तीनही गुन्हेगारांचा आधीचा रेकॉर्ड अशाच बेकायदा कारवाई करण्यात गुंतलेला असलेला आढळला आहे आणि या टोळीचा म्होरक्या सुद्धा अहमदनगरचाच असून चौकशीत त्याचाही रेकॉर्ड अशाच कारवायांत गुंतलेला आढळतो, त्याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती सामाजिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस प्रवक्त्यामार्फत देण्यात आली.
तंत्रज्ञान हे जसं वरदान आहे तसेच अपराध करणाऱ्यांसाठी सुलभ भांडारच, याच्या साह्याने सकारात्मक कामे केली जातात तशीच आपराधिक वृत्तीचे व्यक्तिंनाही तंत्रज्ञानाशी जवळीक करावीशी वाटते पण नुकतेच नागपूरास लाभलेले नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे तंत्रज्ञान व सायबर गुन्हे याच विषयात पारंगत आहे आणि चारच दिवसांपूर्वी नेमके त्यांनी पांढरपोष गुन्हेगारांवर आता करडी नजर असण्याबाबतचेच वक्तव्य केले होते, अशातच हा तंत्रज्ञानाचे साह्याने चालू असलेला गुन्हा आज उघडकीस आला आहे, त्यामुळे नागपूर वासियात नव्या पोलिस आयुक्तांच्या त्या विधानाची चर्चा रंगत आहे.