नागपुरात शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यु: महापौर जोशी
नागपूर: शहरात वाढता कोरोनाचा फैलाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता या महामारी चा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यू शिवाय पर्याय नाही असे मत सार्वत्रिक होत असतानाच आज महापौरांनी शनिवार व रविवार दि १९ व २० रोजी नागपुरात जनता कर्फ्यू पाळावा लागेल असे आवाहन आज जनतेला केले आहे. वार्ताहरांशी बोलताना त्यांनी यासंबंधीच्या आज झालेल्या आढावा बैठकीचा हवाला दिला.
ते म्हणाले की मनपातील पदाधिकारी व माननीय आयुक्तांसमवेत ही बैठक झाली, यात जनप्रतिनिधींच्या लॉकडाउनच्या मागणीवर विचार करण्यात आला तद्नुसार कर्फ्युचे महत्व मांडले गेले मात्र आयुक्तांचे मत पूर्णपणे याविरोधी होते, रोगाचा प्रसार गंभीर प्रमाणात पसरल्यामुळे कर्फ्युत रुग्णांच्याच आरोग्यविषयक सेवांत मिळवण्यात अडचणी वाढतील याशिवाय लॉकडाऊनचा अधिकार राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा करून शनिवार आणि रविवार असा नागपुरात स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यू लोकप्रतिनिधींनी ठरल्यानुसार येत्या शनिवार रविवार व त्यापुढील शनिवार-रविवारीही पाळण्यात येणार आहे, त्या पश्चातही पुढे गरज भासल्यास शनिवार रविवार असाच कर्फ्यु ठेवला जाईल मात्र तत्पूर्वी आजच्या बैठकी प्रमाणेच बैठक घेऊन त्याविषयी निश्चित काय ते ठरवण्यात येईल.
याखेरीज शहरातील आरोग्य यंत्रणेतील प्रभांवाविषयक चर्चाही आजच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य सुविधांचा पुरवठा तसेच आरोग्य यंत्रणेत ४१ नवीन डॉक्टर्स रुजू होत आहेत, सर्व शासकी रूग्णालयांत खाटांची उपस्थिती वाढण्यावर यंत्रणेत भर दिला जाणार आहे, ६३७ खाजगी रुग्णालयांनाही नोटीस जाने प्रारंभ झाल्याने त्यांच्याकडील बेडची उपलब्धताही वाढू लागली आहे अशा सकारात्मक बातम्या नागपूरच्या दृष्टीने आजच्या बैठकीत लाभल्या आहेत.