अतितप्त जून मधे पावसाळी वातावरण: 12 अंश उतरला पारा
नागपुर:- जून मधील नागपुरच्या गर्मीचे तड्याख्याची उदाहरणं सर्वत्र दिल्या जातात मात्र गेल्या दोन दिवसात अतितप्त गर्मीपासून दिलासा भेटलेला आहे, दोन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे आणि मध्यम् मंद पडणाऱ्या सरींमुळे सर्व नागरिक उष्म्यापासून तात्पुरते संरक्षीत आहेत, उष्णतामानात तब्बल 12 अंश सेल्सियसची घट पडलीय व गर्मी पासून दिलासा भेटतो आहे
रविवार सोमवार व आज मंगळवारीही वातावरण ढगाळ असल्याने तापमान कमी जाणवते आहे, अशा वातावरणात बहुसंख्येने लोक बाहेर फिरतांना आढळताहेत. रविवारी शहराचे कमाल तापमान 43.3⁰ नोंदले गेले जे सोमवारी 11.6⁰ नी उतरले, तब्बल 31.57 अंशावर आले, हे सरासरी 10.7⁰ पेक्षाही कमी आहे. तर किमान तापमानही 24.25⁰ होते जे सरासरीपेक्षा 6.2⁰ कमी आढळतेय, तापमान घटल्यामुळे या कमाल तापमानाच्या कालावधीत नागरिकांनाही दिलासा मिळतो आहे, शीत वातावरणांत रस्त्यांवर वर्दळ मात्र वाढली आहे
19.2 मिमी पाऊस नोंद: हवामान विभागाने रविवारी सकाळी 8.30 पर्यंत शहरात 19.2 मिमी पावसाची नोंद केली, यामुळे शहरातील वातावरणात कमालीचा फरक झाला जो रात्रीपर्यंत कायम होता व आजच्या झालेल्या चांगल्या पावसामुळे त्यात अधिकच वाढ जाणवत आहे, त्यामुळे घरोघरी वापरले जाणारे कुलरही थंडावले व ते बंद केल्या गेल्यामुळे विजवितरण प्रणालीसही दिलासा मिळाला आहे.
जवळपास संपूर्ण विदर्भातच अशा प्रकारचे संमिश्र वातावरण राहिले. चंद्रपुरात 21.0 मिमी, यवतमाळ 23 मिमी, वर्धा येथे 6 मिमी पावसाची नोंद केली गेली. वातावरण बदलामुळे संपुर्ण विदर्भात सर्व जिल्हांत तापमानात 32 से 36⁰ घट आढळतेय.
7 सात दिवस असेच ढगाळ वातावरणाची संभावना: हवामान खात्याने पुढील सात दिवस तसेच ढगाळ वातावरणाची व मध्यम सरीच्या पावसाची शक्यता सांगितलेली आहे . 2 जून रोजी मध्यम, जास्त विजा व गडगडाटासह वाऱ्यांच्या प्रभावात हलकी मध्यम पावसाची शक्यता सांगितलेली आहे तर 3 जून रोजी ढगाळ वातावरण कायम राहण्याचा संभव आहे 4 जून रोजी काही ठिकाणी हलक्या सरी. 5 जून मध्यम वृष्टी. 6 जून रोजी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी संमिश्र पाऊस तर 7 जून रोजी अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला गेला आहे. एकुणच संपूर्ण आठवडा गर्मी पासून दिलासादायी राहील.
विदर्भातील स्थिति
- अकोला 39.3
- अमरावती 35.0
- बुलढाना 34.6
- चंद्रपुर 33.5
- गड़चिरोली 36.0
- गोंदिया 36.0
- वर्धा 33.5
- वाशिम 35.0