उत्सव काळात प्रवाशांना दिलासा नागपूर- मुंबई एकेरी विशेष दोन गाड्या;
उत्सव काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष शुल्क आकारुन नागपूर ते मुंबई दोन एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. यापूर्वी उत्सव काळात चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे
1. नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन वे स्पेशल
01076 सुपरफास्ट स्पेशल ता. 15 ऑक्टोबर 2022 पासून नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर
2. नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल
01078 सुपरफास्ट स्पेशल ता. 18.10.2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे.