हिवरी नगरमधील कंटेन्मेंट काढा: व्यापारी कुटुंबांची मागणी
नागपूर:- हिवरी नगर परिसराला कंटेनमेंट म्हणून घोषित व सील करण्यास आज 14 दिवस होताहेत, या दिवसांत कोणतीही नवीन प्रकरणे समोर आली नसल्याने कंटेनमेंट येथून हटवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. एका कुटुंबातील एक मुलगी मुंबईहून परत आली तेव्हा तिच्या आगमनानंतर लगेचच तिला कोरोनाची लक्षणे दिसली, त्यानंतर ती तपासणीसाठी रुग्णालयात गेली.
इथल्या तिच्या पॉजिटिव्ह अहवालामुळे तिला मेडिकलमध्ये दाखल केले गेले, तर तिच्या कुटुंबातील सदस्यांना वनामतीच्या विलगीकरणात ठेवण्यात आले. त्या दिवसापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्यानंतरच्या तपासणीत त्या पॉजिटिव्ह मुलीच्या कुटूंबाचा अहवालही पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, तसेच या भागात नंतर एकही प्रकरण समोर आले नाही. यामुळे आता व्यापा-यांनी आपले काम सुरू करण्यासाठी कंटेनमेंट हटविण्यास्तव मागणी सुरू केली आहे.
या कंटेनमेंट क्षेत्रात सुमारे 300 व्यापा-यांची कुटुंबे राहतात. हा परिसर 28 दिवस बंद राहणार असल्याचे स्थानिक लोकांना कळले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. या भागातील नगरसेवक व अन्य कार्यकर्ते आदींनी कंटेनरमधून हा भाग मुक्त करण्याची मागणी केली आहे.