मनपाने नाही तर केंद्राने बनवलेयत नियम: आयुक्तांचे नगरसेवकांना स्पष्टीकरण
नागपूर:- कोवीड पॉझिटिव्ह रूग्न आढळल्यानंतर मनपाचे वतीने शहरातील काही भागांस संचारबंदी क्षेत्र घोषित केले गेलेय, मात्र दिर्घकाळ प्रतिबंधित असल्याने होत असलेल्या दैनंदिन समस्यांमुळे आधी पांढराबोडी व पश्चात पार्वतीनगर येथील जनतेने नगरसेवकांसह जोरकसपने याविरोधात प्रदर्शन केले होते परंतु आता मनपा आयुक्तांनी अशा क्षेत्रासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचेच दिशानिर्देशानुसार कार्यप्रणाली लागू असल्याचे सांगीतलेय, लोकांस अावाहन करत त्यांनी सांगितले की या संदर्भात मनपा आयुक्तांचे अखत्यारीत नियम नव्याने निर्मीती केले गेलेले नाहीत. लोकांच्या आरोग्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावरच कार्य केले जातेय, करिता कुठल्याही चुकीच्या माहितीने भ्रमित न होता प्रशासनास सहकार्य करावे.
पॉझिटिव्ह रूग्न आढळताच 28 दिवसांपर्यंतचे भाग सील:
आयुक्तांनी सांगितले की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशादर्शक निर्देशानुसार प्रथम रूग्नाच्या निगेटिव्ह झाल्यानंतर पुढील 28 दिवसांपर्यंत संबंधित क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ठेवावे लागत असे. मात्र आता 17 मे रोजी नवीन दिशानिर्देशानुसार पॉझिटिव रूग्न मिळाल्यापासून 28 दिवस त्या भागास प्रतिबंधित ठेवले जात आहे. शहरात याच तत्वप्रणालीस राबवीले जात आहे. सरकारकडून नियम निर्धारित असतात जे वैद्यक व वैज्ञानिक मिमांसे नंतरच ठरतात, 28 दिवसांना 14-14 दिवसांत विभागून आधीचे 14 दिवस अॅक्टिव्ह आणि नंतरचे 14 पॅसिव्हच्या रूपात निर्धारन करत प्रतिबंधित क्षेत्रांत राबवले जातात.
28 व्या दिवशी बाधित होण्याची शक्यता:
ते म्हणाले की कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या परिसरात 95 टक्के लोकांना 2 ते 14 दिवसांत संसर्गाची शक्यता असते, तर उर्वरीत 5 टक्के लोकांपैकी 2.5 टक्के लोक 0 ते 2 दिवस आणि इतर 2.5 टक्के लोक 14 व्या दिवसानंतर 28 व्या दिवसापर्यत संसर्गाची शक्यता असते. या 2.5 टक्के शक्यतेमुळेच 28 दिवसांपर्यंत संबंधित परिसर प्रतिबंधित ठेवणे जरूरीचे आहे. वैद्यक आणि वैज्ञानिक कारणांमुळेच केंद्र सरकारतर्फे दिशानिर्देश तयार केलेले आहेत, ज्यांचा विपरीत अर्थ लावने योग्य नाही. शहरास लवकरच कोरोना-मुक्त व कायमस्वरुपी ग्रीन झोनमध्ये आणण्यास प्रशासनाची प्रयत्न चालू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.