समता सैनिक दल (मुख्यालय दीक्षाभूमी) बनले श्रमिक मजदुर वर्गाचे सारथी
नागपूर:- देशात २४ मार्च २०२० पासून भारत सरकार मार्फत कोरो ना महामारी आणि वैश्विक संकटाचा पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आले आणि अचानक संपूर्ण देश व देशांतर्गत असलेले उद्योगधंदे, कारखाने, दुकाने सगळे बंद करण्यात आले.बाहेर निघण्यासठी पूर्ण भारतभर बंदी घालण्यात आली. आलेल्या ह्या देशबंदीमुळे रोजगाराकरिता उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, कलकत्ता ई. येथून करोडो चा संख्येने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक ई.
राज्यात रोजगारासाठी आलेला असंघटित श्रमिक वर्ग अचानक बेरोजगार झाला. त्यांची कामे बंद झाली. ठेकेदरांकडून आणि मालकांकडून कोणतीच सहायता न मिळाल्यामुळे त्यांचावर उपासमारीची पाळी आली. देशातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे मग ह्या श्रमिक कामगारांनी आपल्या गावी जाण्याकरिता मोठ्या शहरातून पायीच जाण्याचा निर्णय घेतला आणि बघता बघता लाखोंचा संख्येत महामार्गावर मजुरांचे व श्रमिक कामगारांचे जत्थे चा जत्थे दिसू लागले.
ह्या जथ्यांना सुरवातीला केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत घरी पोहचून देण्याची सुविधा न असल्यामुळे त्यांना हजारो मिल पायी प्रवास करावा लागला.. आज ही देशातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्ग पायपीट करतांना दिसत आहे.
समता सैनिक दलाचा अड. स्मिता कांबळे यांनी सांगितले की नागपूर देशाचा मध्यभागी असल्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक ई. राज्यातून लाखो चा संख्येने येणारा मजदुरांना नागपूर बाहेरील महामार्गावरील प्रवास करावा लागत आहे आणि ह्या महामार्गावर हजारो चा संख्येने मजदुर आपल्याला पायी प्रवास करतांना दिसत आहेत. नागपूर पोलिस आणि मुख्यात्वाने सह पोलिस आयुक्त निलेश भरणे यांचा सहयोगाने नागपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या व पांजरी तसेच मनसर नाक्यावर हजारोंचा संख्येत अडकून पडलेल्या मजुरांना त्यांचा स्वगृही पाठविण्यासाठी नाक्यांवर सहायता केंद्र निर्माण करण्यात आलेले आहे.
नागपूर पोलिस यांनी गेल्या २ महिन्यांपासून १३ कम्युनिटी किचन मार्फत लाखो लोकांना जेवण, रेशन आणि वैद्यकीय उपकरण वितरित करणाऱ्या समता सैनिक दल ( मुख्यालय दीक्षाभूमी) यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून श्रमिकांना स्वगृही पोहचविण्यासाठी सहकार्य व मदतीची हाक दिली. लगेचच समता सैनिक दलाचा माध्यमातून १५ सैनिकांची एक तुकडी तयार करण्यात आली आणि श्रमिक मजदुराना त्यांचा घरी सुरक्षित पाठविण्याची मोहीम दलाचा माध्यमातून हाती घेण्यात आली. गेल्या ५ दिवसांपासून समता सैनिक दलाची ही तुकडी पंजारी टोल नाक्यावर दिवस रात्र काम करीत आहे.
दलाचे सैनिक अडकून पडलेल्या सैनिकांची पूर्ण माहिती घेतात, त्यांचा खाण्याची पिण्याची सोय करतात. त्यांची mयोग्य वैद्यकीय तपासणी करून घेतात आणि त्यानंतर त्यांना सुरक्षित बसेस मध्ये बसवून स्वगृही किंव्हा दुसऱ्या राज्याचा बॉर्डरवर रवाना करतात. गेल्या ५ दिवसांपासून हजारो श्रमिक बांधवांची पायपीट आणि त्रास कमी करून त्यांना स्वगृही पाठविण्याचे पवित्र कार्य समता सैनिक दलाने केलेले आहे. पायी येणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे समता सैनिक दलाची जवाबदारी फार वाढलेली आहे.
तरी ही समता सैनिक दल पूर्ण सामर्थ्याने प्रवासी मजादुरांना त्यांचा स्वगृही पोहचविण्याचे कार्य करीत आहे. समता सैनिक दलाच्या तुकडीचे नेतृत्व सैनिक विश्वास पाटील आणि राजेश लांजेवार करीत असून त्यांचा मार्गदर्शनात सैनिक टार्जन दहीवाले, प्रफुल्ल मेश्राम, अजय बागडे, प्रज्वल बागडे,प्रतीक कांबले, धीरज सहारे, नंदकिशोर खोबरागडे, सुखदास बागडे और गौतम पाटिल ई.l काम बघत आहेत. ह्याच बरोबर समता सैनिक दल (मुख्यालय दीक्षाभूमी) शाखा राजीव नगर येथील सैनिक तुफान कांबळे, रितेश देशभ्रधर आणि टीम सुद्धा हिंगणा भागात अडकलेल्या श्रमिकांची माहिती घेवून त्यांना स्वगृही पाठविण्याचे कार्य करीत आहेत.