सैनिटाइजर, गार्ड नसलेले एटीएम ठरू नयेत कोरोना प्रसारक
नागपूर:- शहरातील हजारो लोक विविध बँकांच्या एटीएम बूथवर जाऊन पैसे काढतात, परंतु कोरोना पासूव बचावाच्या सुरक्षात्मक सुविधा येथे उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत एटीएमच्या माध्यमातून कोरोना संक्रमण होण्याची शक्यता बळावत आहे. जिल्ह्यात जवळपास 1300 एटीएम बूथ आहेत. त्यापैकी बहुतेकांत बूथमध्ये प्रवेश नियंत्रण करण्यासाठी गर्दी होऊ न देण्यासाठी व पैशाची सुरक्षा करण्यासाठी पहारेकरीच नाहीत. यामुळे, कोरोना संसर्गाची भीती नेहमीच लागून असते.
ग्राहक मशीनमध्ये पिन कोड प्रविष्ट करण्यासाठी बटणावर आपली बोटे ठेवतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या संक्रमित व्यक्तीने आधीच त्याचा वापर केला असेल तर कोरोनाचा संसर्ग इतर लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतो. कोणत्याही बँकांकडून एटीएम बूथमध्ये सॅनिटायझेशनची व्यवस्था केली जात नाही. बरेच लोक काळजी म्हणून त्यांचेसोबत सॅनिटाईजर आणतात आणि ते वापरल्यानंतरच पैसे काढतात.
कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही:
हुडकेश्वर रोड, मेडिकल, सक्करदरा, वाडी, हिंगणा, कामठी रोड, सीए रोड यासह जिल्हाभरातील एटीएम सुरक्षित नाहीत, तसेच बँकांकडून किंवा पोलिस गस्ती पथकाद्वारे यासाठीची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. सुरक्षा रक्षकांविना एटीएम बूथ रामभरोसे झाले आहेत. अनेक एटीएममध्ये पहारेकरीही नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरेही बस शोपीस म्हणून स्थापित केले गेले आहेत की काय अशीच शंका त्याच्या अवस्थेकडे पाहून येते.
सध्या जिल्ह्यात विविध बँकांचे 1300 हून अधिक एटीएम आहेत, परंतु त्यापैकी 90 टक्के आउटसोर्सिंग एजन्सीकडून चालविण्यात येत आहेत. एटीएम चालविणा-या खासगी कंपन्यांकडून एटीएमची देखभाल न केल्याने शहरातील एटीएमची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. या एटीएममध्ये सुरक्षा रक्षकांसह सॅनीटायझर यंत्रणेची मागणी लोकांनी अनेकदा केली आहे पण कोणीही याकडे लक्ष दिले नाही.
रक्षकांविना असुरक्षिततेचे वातावरण:
आतापर्यंत शहरात अनेक एटीएम तोडण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु तरीही, आउटसोर्सिंग कंपन्या त्याचे देखभाल आणि सुरक्षेकडे लक्ष देत नाहीत. ज्या एटीएममध्ये रक्षक नसतात, ज्यांचे सीसीटीव्ही बंद आहेत, अशा बाबतही ते निश्चित दिसतात. एटीएम लुटण्याचे कारण हेच दुर्लक्ष असावे असे वाटते.
एटीएम ऑपरेट करणार्या खासगी कंपन्या एटीएमची जबाबदारी स्वीकारतात, पण ती देखभाल करण्यास दुर्लक्ष करतात. या कंपन्यांकडून सुरक्षा रक्षकदेखील पुरवले जात नाहीत. त्याच वेळी, जे एटीएम स्वत: बँकाद्वारे चालविले जाताहेत, तेथील गार्डही बरेचदा गडप असतात. एटीएममध्ये रक्षक नसल्यामुळे लोकांना येथे असुरक्षित वातावरण वाटते, परंतु ते त्यांचा वापर करण्यास भाग असतात. सीसीटीव्ही बर्याच वेळा काम करत नसल्यामुळे एटीएममध्ये येणा-या ग्राहकांमध्येही एटीएम कार्ड क्लोनिंग करण्याची भीती कायम आहे. आज बँकांनी ग्राहकांना चिपकार्ड एटीएम कार्ड दिले असले तरीही ग्राहकांच्या मनात अद्यापही भीती आहे.