समाधानकारक पाऊस: तापमानात कमालीचा फरक
नागपूर:- महिन्याचे सुरुवातीलाच पावसाने समाधानकारक पाऊल टाकत प्रवेशाने वातावरण थंडगार केलेय, नवतप्यातील तप्त काहिलीने जनसामान्य त्रस्त होते मात्र नवतपा समाप्तीआधीच पहिल्या पावसाने जिल्ह्याभरात अचानक झालेल्या या बदलांमुळे बुधवारी सकाळी आणि संध्याकाळी चांगला पाऊस बरसला.
या पावसाने शहराला पुन्हा पुर्ववत हालचाली घडवण्यात मदत केली: शहरात बुधवारी सकाळी चार् वाजेपासून विजेचा कडकडाटांसह चांगलाच पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ होते तर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा पावसाने पुनरागमन केले व वातावरण आल्हाददायी राखले, मात्र पावसामुळे काही चौकांत आणि रेल्वे अंडरब्रिज खाली पाणी जमा झाल्याच्या तक्रारीही आल्या.
हवामान खात्याच्या अंदाजा नुसार बुधवारी शहरात 22.8 मिमी पावसाची नोंद झाली, 4 वाजता वीजेच्या कडकडाटसह काही ठिकानी जोमदार जलवर्षाव झाला. त्यानंतरचा संपुर्ण दिवस आकाश ढगाळ होते. वातावरणात थंडावा होता, तिन दिवसांआधी नागरिक येथील अतितप्त उन्हात होरपळत होते व कुठेही बाहेर निघण्यापासून वाचत होते पण अशा या आकस्मिक वातावरण बदलांनी लोकांना बराच दिलासा दिलाय परिणामी रस्त्यावरील वर्दळ वाढली, 30 मे नवतपाचे चोथ्या दिवशीच हा बदल झाला व पश्चातचे दोन दिवसातच वातावरण संपूर्णपणे बदलले. दरवर्षी नागपूर चंद्रपूर चे तापमान या काळात सर्वाधिक असते पण या वर्षाला नवतप्यासही आपल्या वेळेपूर्वीच आटोपते घ्यावे लागले.
फुटाळा येथे तरुणाईने घेतला पावसाचा आनंद: काही भागात वादळी पाऊस तर काही ठिकाणी संथ सरी अशात फुटाळा परिसरात एका भागात तरुणाई पाण्याचा जलतरणाचा आनंद घेत असलेली अाढळली, वादळामुळे काही ठिकाणी झाड पडणे, घरांचे छप्पर उडने, अशा घटना घडल्या. वादळाचे शक्यतेमुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांच्या मदतीस्तव हेल्पलाइन नंबर जारी केलेत, यासंबंधी कुठल्याही प्रकारची अडचण भासल्यास यावर आलेल्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्याचे आदेशही दिले.
आजही असेल पाऊस: हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही अशाच प्रकारची पावसाची शक्यता आहे, पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण कायम राहील. बुधवारी शहरातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस नोंदले गेले तर किमान तापमान 21.3 अंश सेल्सिअस होते, विदर्भात सर्वाधिक पाऊस अमरावती जिल्ह्यात 44.4 मिमी नोंदवला गेला. हवामान विभागानुसार अमरावती, भंडारा-गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 30 ते 40 मैल प्रतितास वारे व पावसाची शक्यता सांगितलेली आहे यासह वादळी पाऊसही संभव आहे.