नागपूर:- नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर आज महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत आयुक्त नागपूर महानगरपालिका यांना आदेश निर्गमित केले.भाजपाच्या नेतृत्वाखालील नागपूर मनपाने फेब्रुवारी महिन्यात मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देणे शक्य नसल्याचे राज्य सरकारला कळविले होते मात्र पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारताच डॉ. नितीन राऊत हे खंबीरपणे मनपा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत वारंवार महाविकास आघाडीकडे पाठपुरावा करीत होते.
डॉ.नितीन राऊत यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा विनिमय करून मा.मुख्यमंत्री महोदयांना भेटले. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेतन आयोग लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आणि आज अखेर नगर विकास विभागाने सुधारित वेतनश्रेणी १ जानेवारी २०१६ आणि प्रत्यक्ष वेतन १ सप्टेंबर २०१९ पासून देय असल्याच्या आशयाचे आदेश निर्गमित केले.