शीतल सुके बीएससी, बीएड शिक्षिकाची जॉब सोडून नागपुरात करत आहे गांडूळ खताची शेती..
शेतीविषयी कुठलीही माहिती नसतांना शीतल सुके यानी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच शिक्षन हे बीएससी, बीएड मध्ये झाले. त्या नागपूर मध्ये विद्यालयात शिक्षिका होत्या. त्यांना शेती क्षेत्रात पूर्णपणे काम करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी शिक्षिकाची नौकारी सोडून दिली. ‘काहीही करा, पण शेती करू नका.’ अश्या प्रकारचा सल्ला शेतकरी आपल्या मुलाला देत असतो. त्यामुळे कमी रुपयाची जॉब का असेना शेतकऱ्याचा मुलगा शहरात जाऊन काम करत असतो. एका अर्थाने त्या शेतकऱ्याच सुद्धा बरोबर असते. निसर्गाचे बिघडत चाललेले संतुलन, वारंवार होणारी अतीऋष्टी, पिकांना योग्य भाव नाही, रासायनिक खतामुळे मातीची सुपीकता कमी होणे, त्यामुळे उत्पादनात घट होणे. इकडे कर्ज वाढत जाणे. ह्या सर्व कारणांमुळे शेतकरी हताश झाला आहे. एकदाची मुलाने शहरात जाऊन कमी रुपयाची नौकारी केलेली चालेल पण शेती नको. अशी शेतकऱ्यांची परीस्थिती झाली आहे. मात्र एकीकडे एक इंच शेती नसलेल्या ‘शीतल सुके’ यांनी शेती क्षेत्रात काम करण्याचे ठरवले.
“सासरी किंवा वडीलांकडे एक इंच शेती नव्हती, त्यामुळे शेतीचा अनुभव कोणताही नव्हता. माझ्या नात्यासंबंधात शेतीची आवड म्हणून त्यांनी शेती विकत घेतली. मी आणि माझे पती कृष्णाजी सुके आम्ही सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी त्यांच्या शेतीला भेट देत होतो. या भेटीमुळे शेतीशी आणि निसर्गाशी आमचे चांगले संबंद तयार झाले. एक प्रकारचा शेतीशी लगाव निर्माण झाला.” शीतल सुके मराठीजागरशी बोलतांनी म्हणाल्या.
श्रीमती शीतल आणि त्यांचे पती कृष्णाजी यांनी शेती करायचे ठरवले. दोन एकर शेती भाड्याने घेऊन त्यांनी शेती करायला सुरवात केली. शेती करतांना त्यांना अडचणी आल्या मात्र त्यांनी त्याच्यावर मात करून चांगले पीक घेतले. शीतल सुके यांच्या म्हणण्यानुसार सुरवातीला त्यांनी तुरीचे पीक घेतले होते.
शेती विषयक माहिती मिळवतांना त्यांना ‘गजानन जाधव’, जे व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे संस्थापक आहे, यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यूट्यूब चॅनल वरुण श्रीमती शीतल आणि त्यांचे पती कृष्णाजी यांनी संपूर्ण पिकाचा, मातीचा, वातावरणाचा, खताची आणि शेतीपुरक व्यवसायाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला.
“शेतीविषयक पिकांचा अभ्यास करतांना आम्हाला असे भासले की रासायनिक खतामुळे मातीची सुपीकता कमी झाली आहे. 60 वर्षापासून सतत वापरत चाललेले रासायनिक खत यामुळे शेतीतून मिळणारे उत्पादन कमी झाले आहे. जमिनीची सुपीकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी शेंद्रिय खताचा वापर करावा लागणार हे आम्हाला समजलं होतं. त्यामुळे मी गांडूळ खताची शेती करण्याचा निर्णय घेतला.” शीतल सुके म्हणाल्या. गांडूळ खत शेतीसाठी खूप उपयोगाचे आहे. यात ‘नत्र- स्फुरद-पालाश’ असल्यामुळे पिकाला वाढीसाठी खूप फायदा होतो. गांडूळ खत हे टाकाऊ पदार्थ पासून बनत असल्यामुळे त्यामागे खूप कमी खर्च असतो म्हणून तो शेतकऱ्यांना परवडतो. कुठल्याही पिकासाठी गांडूळ खत हानीकारक नसून त्याचे फायदेच फायदे शेतीसाठी आहे.“सुरवातीला गांडूळ खताविषयी माहिती काढणं खूप महत्वाच होत. मेरठ, उत्तर प्रदेश इथे ‘सजक ऑर्गनिक’ म्हणून गांडुक खत मोठ्या प्रमाणात तयार केले जाते. आम्ही तिथे जाऊन गांडूळ खताचा पूर्णपणे अभ्यास केला. ‘सजक ऑर्गनिक’ चे संस्थापक अमित त्यागी यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले.” ‘गांडूळ खत तयार करतांना कोणत्याप्रकारची गांडूळ जात आपण वापरतो हे सुद्धा महत्वाची आहे. कोणत्याही वातावरणात अनुकूल असलेली भारतात एकच जात आहे ती म्हणजे ‘आईसेनिया फेटीडा’. एक किलो गांडुळाची किंमत ही 450 रुपये होती. आम्ही ती मोठ्या तडजोडीने मिळवली.
शीतल सुके यांनी चार एकर जमीन भाड्याने घेऊन गांडूळ खताची शेती करण्यास सुरवात केली. सुरवातीला त्यांनी आठ बेड टाकले. एका बेडची लांबी रुंदी ही 4 फुट * 30 फुट. या बेड मध्ये जाड प्लॅस्टिक कापड आथरला, जेणे करून गांडूळ जमीत जाऊ नये आणि त्याच बरोबर गांडूळ बाहेर जाऊ नये म्हणून विटांचा बेड बनवण्यात आला.
एका बेड मध्ये 1500 किलो शेन तर त्या मागे 30 किलो गांडूळ टाकले गेले. गांडूळ टाकल्यावर संपूर्ण बेडला तनसणे झाकल्या गेले. गांडुळाला कोणत्याही प्रकारची हानी नाही व्हावी म्हणून. गांडुळाला अनुकूल असे तापमान 25-28 डिगरी असणे गरजेचे आहे. एका बेडला पूर्णता गांडूळ खात तयार होण्यासाठी जवळपास दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागतो.
कुही, मांढल, पचखेडी या गावातील शेतकरी ‘श्री उमेश मुळे’ आणि गुणवंता लांजेवार यांनी आमच्या पासून गांडूळ खत नेले. त्यांनी ते गांडूळ खत मिरची या पिकाला टाकले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना गांडूळ खताचा खूप फायदा झाला. त्यांच्या पिकावर कोणत्याही रोगाने आक्रमण केले नसून मोठ्या प्रमाणात फूलबहार आणि उत्पादन पकडले आहे. त्यांचे 75 टक्के रासायनिक खताचा आणि फवारणीचा खर्च कमी झाला असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .