नागपूरची सिद्धी दुबे भारतीय नौदलात फ्लाइंग पायलट बनली
देशाच्या मुली आता प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. एकेकाळी मुलींचं सैन्यात भरती होणं हे स्वप्न असायचं, पण आज देशाच्या मुली प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमवत आहेत. नागपूर शहराची कन्या सिद्धी दुबे हिनेही असेच काहीसे केले आहे. 22 वर्षीय सिद्धी दुबेची नौदलात फ्लाइंग पायलट पदासाठी निवड झाली आहे.
सिद्धी ही तिच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे जी देशसेवेसाठी तत्पर आहे. सिद्धीचे आजोबा भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि तिचे वडील भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले होते. SSB परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, नौदलात फ्लाइंग पायलटसाठी 396 लोकांनी पाच दिवसांच्या कठोर मुलाखत प्रक्रियेत भाग घेतला, त्यापैकी 4 जणांची निवड झाली आहे. आणखी चांगली गोष्ट म्हणजे या चार लोकांपैकी तीन मुली आहेत. भारतीय नौदलातील महिला वैमानिकांची ही दुसरी तुकडी आहे. पहिल्या बॅचमध्ये 1 महिला फ्लाइंग पायलट होती. आता तिघांच्या निवडीनंतर ही संख्या चार झाली आहे.