सहा रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी
नागपूर:-कोरोनाच्या महासंकटात नागपूर शहरासाठी एक आनंददायी बातमी आहे. कोरोनाची लागण झालेले आणि उपचार घेत असलेले सहा रुग्ण पूर्णतः बरे झाले असून सोमवारी (ता. २७) त्यांना सुटी देण्यात आली.
पूर्णतः बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये एक रुग्ण कामठी, एक सतरंजीपुरा आणि ४ जबलपूरचे ज्यांचे वास्तव्य सध्या मोमीनपुरा येथे होते, यांचा समावेश आहे.या सर्व सहाही रुग्णांना १२ एप्रिल रोजी आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.
उपचारानंतर १४ व्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी आणि १५ व्या दिवशी म्हणजे २६ एप्रिल रोजी त्यांचे नमुने घेण्यात आले. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्व सहाही जणांना आज घरी पाठविण्यात येत असल्याचे मेयो रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले.सर्व रुग्णानी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्याचे आणि प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले. उपचार करणाऱ्या चमूनेही त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
News credit to:- NMC