आतापर्यंत 9805 विनामास्क वावर करणा-यांवर कारवाई, ₹32.61 लाख दंड
नागपूर:- महानगर पालिका एनडीसी पथकाने आतापर्यंत एकूण 9805 नागरिकांवर मास्कचा वापर न केल्याची आणि सामाजिक अंतर न पाळण्याबाबत कारवाई केली आहे. असे असूनही, काही लोक अजूनही निष्काळजीपणाने वावरत नियमांचे पालन करीत नाहीत. या कारवाईत सुरूवातीपासून शुक्रवारपर्यंत नागरिकांकडून एकूण ₹32,61,500 दंड वसूल करण्यात आला आहे. चौकांत आणि सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे मास्क न लावणा-या निष्काळजी लोकांवर मनपा आणि पोलिस प्रशासन नियमितपणे चालान करत आहेत.
शुक्रवारी मनपा आणि शहर पोलिस विभागाच्या एनडीसी पथकाने एकूण 515 जणांवर कारवाई केली. यात पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांनी 224, वाहतूक विभागाने 64 आणि एनडीसी पथकाने 187 जणांचे चालान कापले. तिन्ही विभागांच्या कारवाईत एकूण 2,18,300 रुपये दंड आकारण्यात आला. या व्यतिरिक्त 40 नागरिकांवर सामाजिक अंतर पालन न केल्याची कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर 9,300 रुपये दंड ठोठावण्यात आला.
ईतक्या संख्येने कारवाई सुरू असूनही, कोरोना संक्रमण दरम्यान अजूनही बरेच नागरिक मास्क परिधानाकडे दुर्लक्ष करताहेत. असे लोक स्वत:सह इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करत आहेत.