तर शहरात होईल कोरोना स्फोट: आयुक्त मुंढे
नागपूर:- ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारचे मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात संचारबंदीत सूट देण्यात आली आहे, परंतु सूट मिळाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष देऊन सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही तर शहरातील ‘कोरोना स्फोट’ तिव्रतेने वाढण्याचा इशारा मनपा आयुक्त मुंढे यांनी दिला. याची तीव्रता गांभीर्याने घेत त्यांनी लोकांना नियमपालनाचे आवाहन केलेय.
ते सांगतात, कोविड19 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करत लोक बेजबाबदारपणे काम करताहेत, कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. चारचाकी वाहनात एक प्लस टू आणि दुचाकीवर केवळ एका व्यक्तीस परवानगी आहे, त्याचे उघडपणे उल्लंघन केले जाते आहे.
जनतेसाठी धोकादायी: लॉकडाऊनमध्ये सूट मिळणे म्हणजे स्वतःचे आणि इतरांचा जीव धोक्यात आणणे नव्हे. सूट मिळाल्यानंतर लगेचच मास्कनिना सार्वजनिक ठिकाणी जाणे, सामाजिक अंतर न पाळणे, गरज नसेल तरी घराबाहेर पडने यामुळेच संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. ही लोकांसाठी धोक्याची बाब आहे.
सध्या देण्यात आलेल्या सवलतींत अशा उल्लंघनांच्या घटनावाढीतही काटेकोरपणे कारवाई केली जात नाही. परंतु जर तत्सम नियमांचे उल्लंघन होतच राहिले तर संबंधितांवर आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई केल्या जाईल. त्यामुळे कोरोनाशी लढयात प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नाईक तलाव, बांग्लादेश परिसरात संवाद:
सतत रूग्णसंख्या वाढ आढळत असलेल्या नाईक तलाव आणि बांग्लादेश परिसरांत लोकांत दहशत वाढतेय करिता मनपाच्या अधिका-यांच्या पथकाने तेथे लोकांना संवाद साधत दिलासा दिला आहे. संवादादरम्यान त्यांनी सांगितले की एकमेकांशी संपर्कात आर्यावर्त कोरोनाचा संसर्ग पसरतो. रुग्णालयांत कोरोनावर यशस्वी उपचार केला जातोय, बरे होणार्यांची संख्या वाढती आहे. म्हणूनच, लक्षणे दिसल्यास विलगीकरनात जाण्याचा सल्ला दिल्यास प्रशासनाने विरोध करू नये. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, विलगीकरण कक्षात रहाणे आवश्यक आहे