विशेष बैठक: नागपुर, चंद्रपुरचे पालकमंत्री व जिल्हाधिका-यांची उपस्थिति
नागपुर:- आज नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अवैध रेती वाहतुकीने निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था या विषयावर गृह व इतर संबंधित विभागांची बैठक घेतली. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत जी, चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे आमदार आशिष जयस्वाल जी, विभागीय आयुक्त, नागपूर डॉ. संजीव कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नागपूरचे पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प नागपूर योगेश कुंभेजकर उपस्थित होते.
तसेच या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली जिल्ह्यातील संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, गोंदियाचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उमस्थित होते.