EducationSchool

राज्य माध्यमिक शालांत परिक्षा दहावी (एस एस सी) चा निकाल जुलै २९ रोजी

नागपूर, दि. 28 : मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल उद्या (दि. 29 जुलै) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
इयत्ता 10 वीच्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील संकेतस्थळावर उपलबध होतील. www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, तसेच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांचे स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. यासाठी विभागीय मंडळाकडे http://verification.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येतील. यासाठी आवश्यक अटी तसेच सूचना संकेतस्थळावर आहेत. गुणपडताळणीसाठी 30 जुलै 8 ऑगस्टपर्यंत तसेच छायाप्रतींसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. यासाठी ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय तसेच नेट बँकिंगद्वारे भरता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
मार्च 2020 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, अशी माहिती राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.