हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याविषयीचे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन
नागपूर: कोरोना काळात बाजारात दाटलेली मंदी, लॉकडाउन मधे सर्व बंद राखून झालेले नुकसान आता दिवाळीनिमित्तच्या खरेदीत काहिअंशी का होईना पण भरपाईकडे नेईल असे आशावादी चित्र असताना दुकानं सुरू ठेवण्याची कालमर्यादा मात्र जाचक आहे त्यामुळे व्यापारी, विक्रेत्यांत काळजी दाटली आहे.
दिवाळीनिमित्त सर्व बाजारपेठा तुडुंब आहेत ग्राहक की वाढली आहे विक्रेत्यांचे आशावादी दिवस आहेत व्यवसायाच्या संधीही वाढल्या आहेत पण प्रशासनाने हॉटेल रेस्टॉरंट आणि दुकाने रात्री दहा पर्यंतच सुरू ठेवण्याचा आदेश काढला असल्याने कित्येक व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे, दिवाळीसारख्या सणात खरेदी रात्री उशिरा बारापर्यंत सुरू असते त्यामुळे ही वेळ ऐवजी बारा पर्यंत वाढवावी अशा आशयाचे निवेदन करून नागविदर्भ कॉमर्स चेंबर चे सचिव अहिरकर यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळाने महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, व आयुक्त राधाकृष्णन बी यांना दिले आहेत.
नागपूर देशाच्या मध्यवर्ती भागात असून केंद्रानेही मेट्रोपोलिटन सिटी म्हणून घोषित केली आहे, सद्ध्या प्रशासनाने हॉटेल, रेस्टोरेंट रात्री १० वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. लोक रात्रीस ९ नंतर घराबाबेर पडून खरेदीस जाण्याचा आजकाल ट्रेंड आहे अशात फक्त तासाभराच्या अवधीत विक्रेता व खरेदिदार दोहोंचे समाधान होत नाही. विक्रेत्यआंचे आर्थिक नुकसान ते वेगळेच. करिता प्रशासनाने हॉटेल रेस्टोरेंट व दुकानें खुली राखण्याची वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी केली जात असल्याची माहिती सचिवांनी दिली.
ते म्हणाले, कोरोना काळात हॉटेल रेस्टोरेंट ६ महिने बंद होते, त्या काळात सर्वांनीच आर्थिक झळ सोसली, आता सर्वकाही पुर्ववत होत असतांना वेळेचे निर्बंध लावले जाने हे व्यापा-यांसाठी फारच निराशादायी आहे, मध्यवर्ती शहर असल्याने बाहेर प्रांताहून येणा-यांची संख्या नागपूरात अधिक आहे अशांचे व नागपूरकरांच्या सोयीसाठी वेळ वाढवून देणे हितकर आहे म्हणूनच तत्संबंधी मागणीचे निवेदन केले गेले आहे.