मास्क न लावणारे, सोशल डिस्टंसिंग न पाळणा-यांविरोधात आता कडक कारवाई
नागपूर: शहराचे महापौर संदीप जोशी यांनी नागपूर शहराचे नवनियुक्त मनपा आयुक्त व नवनियुक्त पोलीस आयुक्त यांचेसोबत आज संयुक्त बैठकीस हजेरी लावली, दोघेही नव्याने आलेयत व सर्वप्रतिनिधीसह बैठकीत झालेल्या चर्चांबाबत माहिती देताना जोशी यांनी सांगितले की कोरोना लढ्यात निर्देशानुसार न वागणाऱ्या, नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील नागरिकांवर यापुढे सक्तीने कारवाई करण्यात येईल. तोंडावर मास्क न वापरता फिरणा-या, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणा-या अशा उल्लंघनकर्त्यां विरोधात कठोर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
कोरोना प्रसार विरोधात, रोखथामात एकत्रितपणे कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो याबाबतची या बैठकीत चर्चा झाली. महानगरपालिकेने अशी ही कारवाई सुरू केली आहे, व उद्यापासून पोलिस विभागातर्फेही अशाच कठोर कारवाईची सुरुवात होणार आहे.
याबाबत प्रसिद्धी विभाग माहिती देईलच, बैठकीत कोरोना प्रसार रोखथामात कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत चाचपणी केली गेली, जनता कर्फ्यू, लॉकडाऊन अशा संबंधित उपायांचेही प्रसंगी नियोजन केले जाईल याबाबत चर्चा झाली.
कोरोना विरोधातील या लढ्यात संयुक्त प्रयत्नांची शिकस्त राखण्याचा सर्व मिळून प्रयत्न करू व कोरोनास दूर सारू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.