विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणार विद्यार्थी संघटना
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर चे कुलगुरू मा. सुभाष चौधरी यांना PG पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांमध्ये २० टक्के प्रवेश कोटा वाढविण्याबाबत निवेदन देण्यात आले.
२०२० या संपूर्ण कालावधीत कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने विद्यार्थांच्या हितासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्वच विध्यापीठांनी इंटर्नल मार्क्स व ऑनलाइन परीक्षा नुसार विद्यार्थ्यांना गुण दिले त्यामुळे ९५ ते १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले परंतु पुढील शिक्षणाकरिता अर्ज केला असता त्यापैकी २५ टक्के विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळू शकला नाही.
विद्यार्थी रोज संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालय फिरतात परंतु सर्वच महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत असून पुढील आयुष्याची चिंता पडली आहे.
तरी आज कुलगुरू सरांन सोबत युवासेना, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांचा पदाधीकारांनी या विषयावर चर्चा केली व २० टक्के जागा लवकरात लवकर वाढविण्यात यावे अशी मागणी केली जर मागणी पूर्ण झाली नाही तर विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.